मिसळभोक्ता लिहितात..

हे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना "भां*त", आणि "बा*वला तिच्यायला" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे!

धन्य तात्या ! आणि धन्य तो अनाम म्हातारा !


Wednesday, October 22, 2008

विनोदी चित्र!

दिवाळी निमित्त शर्ट पँट घातलेल्या 'खट्टोबा ढेकर' ह्यांचे अंमळ विनोदी चित्र! कसं वाटलं ते जरुर कळवा...ह्या ब्लॉगच्या समस्त वाचकांना दिवाळीच्या शुभेच्छा!

मिसळप्रेमी

Wednesday, October 15, 2008

बाळीशा भाग २

बाळीशा भाग २

अरे असं काय करतोयंस बाळीशा. नाही मिळाले तुला मराठीच्या पेपरात जास्त गुण म्हणून इतकं का हिरमुसायचं? अरे थोडी तयारी केली की कोणालाही पास होता येतं. इतके दिवस माझ्यासोबत राहूनही तू बाकी फारच हळवा राहिलास बेट्या. थांब मी जरा तुला थोडंस समजावूनच सांगतो. तू काळजीपूर्वक बघितलंस का पेपराकडं? तुला सहसंदर्भ स्पष्टीकरणाचे गुण मिळाले नाहीत म्हणून तुझा एकंदर स्कोअर खाली आला बघ.

काय म्हणतोस? तुला संदर्भासह स्पष्टीकरण जमत नाही? किती रे वेंधळा तू बाळीशा! संदर्भासह स्पष्टीकरण हा तर भलताच सोपा प्रश्न. उदाहरण देऊ म्हणतोस? तू बाकी खरा वेंधळा आहेस की वेंधळ्याचे सोंग घेऊन वावरत आहेस हेच समजत नाही बाळीशा.

ठीक आहे. आपण ग्रेस यांची 'तुला पाहिले मी' ही कविता घेऊ.

तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळे

मी तुला नदीच्या किनारी पाहिले तेव्हा तुझे केस पाठीवर मोकळे होते. इथे नदीचे नाव दिलेले नाही त्यामुळे ग्रेस यांच्या कवितेचा संदिग्धपणा अधोरेखित झाला आहे. शिवाय 'केस मोकळे' म्हणण्याऐवजी 'केस पाठीवरी मोकळे' असे म्हटले आहे. कवितेच्या हिरॉईनचे केस हे लांबसडक आहेत. लांबसडक केसांची मजा काही औरच. अगदी 'सुंदर लंबे काले बाल, घने घने मतवाले बाल, डाबर आंवला केश तेल' या अतिमधुर गाण्याची आठवण येते. काय कोमल ऋषभ आणि गंधार लावला आहे त्यात. असो. त्या गाण्यातील सौंदर्यस्थळे पुन्हा कधीतरी...

तुझी पावले गे धुक्याच्या महाली
ना वाजली ना कधी नादली
निळा गर्द भासे नदीचा किनारा
न माझी मला अन तुला सावली

ओहोहो... तुझी पावले धुक्याच्या महाली कधी वाजली नाहीत वा नादली नाहीत.

नदीचा किनारा निळा गर्द भासतो आणि माझी मला आणि तुझी तुला सावलीही नाही.

धुक्याचा महाल असे म्हटल्याने कवितेचा धूसरपणा अधोरेखित होतो.संगीत हा ह्या परमसृष्टीचा जीव की प्राण आणि संगीताची मजा आवाजावर अवलंबून असते. मात्र पावलांचा आवाजही न आल्याने कवितेला एक गूढत्त्व प्राप्त झाले आहे असे वाटते. नदीचा निळा गर्द किनारा या उपमेतून ग्रेस यांच्या स्वप्नील प्रतिभेचा प्रत्यय येतो.

आजकाल प्रदूषणामुळे सर्व नद्यांची वाट लागली असली तरी ग्रेस यांना नदीचा गर्द निळा किनारा दिसत आहे. झाडे तोडून लोकांनी पर्यावरणाचीही वाट लावल्याने एकमेकांच्या सावल्या घ्याव्यात म्हणावे तर त्या सावल्याही नाहीत. ग्रेस यांनी बहुधा दुपारी बारा वाजता ही कविता लिहिली असावी. सूर्य डोक्यावर असल्याने यावेळी सावली पडत नाही.

आता आपण थेट शेवटच्या ओळीकडे जाऊत.

तमातून ही मंद ता-याप्रमाणे
दिसे की तुझ्या बिलवरांचा चुडा

क्या बात है.. ! 'तमातून ही मंद ता-याप्रमाणे दिसे की तुझ्या बिलवरांचा चुडा" अशी ओळ. बिलवरांचा चुडा तमातूनही मंदतार्‍याप्रमाणे दिसतो... क्या बात है..! किंबहुना लोडशेडिंगच्या या दिवसांमध्ये आय मीन रात्रीमध्ये लोकांच्या डोळ्यांपुढे तारे चमकले असले तरी ग्रेस यांच्या डोळ्यांपुढे बिलवरांचा चुडा आहे.

असो, एक हृदयाला हात घालणारं गाणं! एखाद्या सर्जनशील, संवेदनशील चित्रकराला हे गाणं नुसत ऐकून हातात कुंचला घ्यावासा वाटेल आणि त्याच्या कॅन्व्हासवर डौलाने जाणारी ती छानशी पाठीवर मोकळे केस घेऊन जाणारी तरूणी उतरेल.. त्या चित्रात पार्श्वरंग असतील पर्यावरणाचा नाश, नदीचे वाटोळे आणि लोडशेडिंगच्या संकटाचे !!!

बघितलंस बाळीशा झाले संदर्भासह स्पष्टीकरण लिहून.

काय म्हणतोस? अगदी नि:शब्द झालास हे वाचून!!

अरे किती रे चांगला तू बाळीशा. मी अगदी कॄतज्ञ आहे बघ.


तू म्हणून मी ही युक्ती इथे सांगितली. मराठीचा पेपर जाऊदेबस. पुढे मागे मराठी संकेतस्थळांवर गुणग्राहक व्यक्तिमत्त्व म्हणून वावरशील बेट्या. अरे अशी रसग्रहणे पाडायची म्हणजे फक्त बैठक पक्की असावी लागते. एकदा बूड जमवले बसल्या बैठकीत दोनचार लेखही सहज पाडशील, म्हणताम्हणता लोकप्रिय होशील.

लोक प्रतिसाद देणार नाहीत? काळजी नको! लोक प्रतिसाद देतातच. पानवाला जसा पानावर चुन्याचे बोट लावून ठेवतो तसे लेखात ठिकठिकाणी कोमल, द्रुत, गंधार, ऋषभ अशी बोटे पुसून ठेवायची. मंडळी सगळ्यात जास्त कशाला घाबरत असतात तर आपले अज्ञान उघडे पडेल याला. अशी रंगीत बोटे बघितली की आपोआप प्रतिसाद टपाटपा पडतील.तरीही प्रतिसाद मिळाले नाही तर? फारच शंकेखोर बुवा तू. सपकसुप्रियेला भेटला होतास काय? हा हा.

अरे एकदोन वेगळ्या नावाचे आयडी हाताशी ठेवायचे. शक्यतो स्त्रियांची नावे घ्यायची आणि त्या आयडीमधून "वा बाळीशा काय हो तुमचं लिखाण हापूस आंब्यासारखं यम्मी" असले प्रतिसाद द्यायचे.

उदा. मीनल हाच आयडी घे. हां आता तुला तो आयडी घेता येणार नाही. सरपंचांनी आधीचे घेऊन ठेवलाय तो!

मीनल, प्राजक्ती, पल्लवी असे आयडी वापरून, "मला या लेखात पूर्वीसारखी मजा आली नाही" असे म्हणायचे. आणि मग खाली "शक्य आहे. या गाण्यात मी केवळ पर्यावरणविषयक सौंदर्यस्थळे उलगडवून दाखवली होती" असे स्पष्टीकरण द्यायचे.

काय म्हणतोस? खोटारडेपणा? कित्ती रे भोळा तू बाळीशा. जरा चारचौघात उठबस करायला शिक. तुझ्या पुस्तकी ज्ञानाचा इथे उपयोग नाही. थोडे व्यावहारिक ज्ञानही हवे. काय समजलास?

Saturday, October 11, 2008

पोष्ट मन

नंदा प्रधान कळवतात,

'पोष्ट मन' हे खाते स्वतः तात्या आणि त्याच्या भाड्याच्या तट्टूंचेच आहे हे कुणाच्याही लक्षात आले नाही, ह्यावरुन मिपावरील बहुसंख्य सक्रिय सदस्यांच्या बुद्धीमत्तेची ओळख व्हावी.
अधुन मधुन असल्या खात्यातुन स्वता:च काहीतरी गरळ ओकायची आणि मग मनोगताच्या नावाने वाटेल त्या भाषेत शिमगा करायचा हे नेहमीचेच आहे.


ह्यावर मी तात्याला एकच प्रश्न विचारला होता, तो अर्थातच तात्याचे भांडाफोड करणारा असल्याने त्याने २ मिनिटात उडवला.
मी एवढेच विचारले की, 'काय रे तात्या? त्या मनोगतावर कधी 'मिपाशिवीगाळ' हा प्रकार बघण्यात नाही, मग इथेच का 'मनोगत तिरस्कार सोहळा' वरचेवर चालू असतो?'
ह्यावर प्रतिसाद डिलिट करणे एवढेच उत्तर मंदबुद्धी तात्या देऊ शकला.


तिकडून उडवले तरी आज ह्या ब्लॉगमुळ हे विचार शेकडो लोकापर्यंत पोहचु शकतात हे त्या बिचार्‍या तात्याला माहित नसावे

-नंदा प्रधान

---------------------------------------------------------------------------------------------------------

एक निवेदन :-

इथे लिखाण करणार्‍या कुणाचाही आयपी आम्ही ट्रॅक करत नाही आणि तो सार्वजनिकरित्या प्रकाशित करण्याचा बिनडोकपणा आम्ही कधीच करणार नाही.

ह्या ब्लोगची होणारी वाचने आणि इथे येणारा लिखाणाचा/प्रतिसादांचा ओघ बघुन आम्ही भारावुन गेलो आहोत.

मिसळप्रेमी व्यवस्थापन,