मिसळभोक्ता लिहितात..

हे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना "भां*त", आणि "बा*वला तिच्यायला" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे!

धन्य तात्या ! आणि धन्य तो अनाम म्हातारा !


Friday, February 6, 2009

कम्युनिष्ठ मिपा

Aatach misalpav.com var vachalela ha dhamal pratisaad.

नीलकांतराव

प्रेषक चोरीराम कोतवाल ( बुध, 02/04/2009 - 15:27) .

मी असंही ऐकलं आहे की कम्युनिझम हा असा विचार आहे की ज्यांना तो मान्य नसेल त्यांना संपवण्याचा एकमेव मार्ग कॉमरेडांना माहीती आहे. शोध घेता जगातील समुहहत्या करणार्‍यांत कम्युनिष्ठांचं नाव येणं हे सुध्दा सहज आहे ना? ऍटॉक्रसी किंवा हुकूमशहा बाबत तुमचं काही विशेष तत्वज्ञान आहे का?

लोकशाहीचा तुम्हाला आलेला कळवळा समजू शकतो पण इथे गेले १ वर्षभर आणीबाणी आहे आणि नुकताच एका सदस्याचा ह्या संकेतस्थळावर अकाली मृत्यु झाला / इथल्या खरोखरच्या कम्युनिष्ठांनी त्याला संपवला हा समुह हत्येचाच एक भाग मानायचा का? त्या विषयी तुम्ही का गुळणी धरलेली आहे? का त्याचेही काही विशेष तत्वज्ञान आहे? का लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वत: कोरडे पाषाण?
---
हा मारला गेलेला सदस्य विश्वकर्मा नीलकांत ह्यांचा मित्र आहे म्हणे आणि तरीही त्यांनी ह्या हत्येविषयी गुळणी धरली आहे!

वाह रे मित्रप्रेम.. काय तुमची कम्युनिष्ठा!! हा हा हा

Thursday, January 22, 2009

मज्जाच मज्जा

मज्जाच मज्जा चालू आहे सगळी.

आता हेच पहा ना काही दिवसापुर्वी हे कार्ट इथे येऊन काय बोलल ते.

Quote

जैनाचं कार्ट said...
मिसळपाववरिल मनमानी कारभार मला पसंत नसल्याने माझे आयडी काढून टाकण्याची मी विनंती केली आहे।November 27, 2008 6:00 AM

Unquote
आणी आता परत हाजी हाजी करायला लागलं आहे म्हणेप्रभूंनी धोंडोपंतांच्या जागी संपादक मंडळात वर्णी लावण्यासाठी श्रेष्टींजवळ बोलतो असा शब्द दिला आहे असे आतल्या गोटातून कळते।

तात्या फारतर त्याला ख।फ.चा संपादक करुन अक्षता लावणार

Tuesday, January 13, 2009

खरूज

मिसळपाववर तात्याची मिपाकरांनीच जाहीर भादरल्यावर तात्याने उडवलेला स्वत:चाच हा खाजवुन खरूज उकरणारा प्रस्ताव पहा

--------------------------

आपल्या मराठी आंतरजालावर मनोगत, उपक्रम, मायबोली या सारखी संकेतस्थळं आहेत।
या संस्थळांवरची काही मंडळी,"तो तात्या आणि त्याचं ते मिसळपाव ना? जाऊ द्या! ती साली तसलीच लोकं आहेत!"असं बर्‍याचदा आपापासात कुजबुजताना आढळतात!

आता 'तसलीच लोकं' म्हणजे कशी लोकं? हे मला कुणी सांगू शकेल का? बाकी जाऊ द्या! आम्ही आपले आमच्या मिपाच्या परिवारात खुश आहोत, सुखी आहोत!

काय बोल्ता मंडळी? खरं का नाय?!

आपला,
(तसलाच!) तात्या।

Monday, December 15, 2008

संकेतस्थळावर सध्या जे जोरात युध्द चालू आहे त्यास समर्पीत।


संकेतस्थळावर सध्या जे जोरात युध्द चालू आहे त्यास समर्पीत।

जे काव्य तेथ मी रचले इथेही ते जोडेन का ?
प्रतिसाद जो नव्हता तिथे इथे मला भेटेल का?

मी राहतो इथे सदा, मी जाणतो मनोगती !
जे मी मुकेपणी पाहतो, तर्रीत ते रंगेल का ?

हा लेख घटकेचा खरा जाईल जरी लांबतो !
साद देता त्याला कधी, वरती कधी येईल का?

माझे मनोगत मी तुला, केले निवेदन आज
हेसर्वस्व मी त्यास वाहीले, तुजला कधी उमजेल का

Saturday, December 13, 2008

एका ज्योतिश्याची कैफियत

एका ज्योतिश्याची कैफियत

अरे बेशरम्यांनो, मला का विचारता मुंबईवर हल्ला होणार हे भाकित माझ्या ब्लागावर पूर्वीच का नाही टाकले? अरे मी दोन दिवस आधीच मिपावर हा 'हल्ला होणार आणि सर्व दहशतवाद्यांची नावे' असा लेख मिपावर टाकला होता। रात्री टाकला न् सकाळी उठून पाहतो तर गायब।

तात्याला विचारले, हे काय डायरु, अरे अघोषित आणिबाणी होती तर आधी तरी बोलायचस।

तर चावट मेला म्हणतो कसा - "अरे तुला रात्री जास्त झाली. उगाचच भास झाला की आपण हे भाकित आधीच जनतेला सांगतोय. तसे नसते तर तू सात दिवसाचा 'लेखन उपास' केला असतास काय. उद्विग्न, खिन्न, विषण्ण असे डोळ्यात पाणी आणणारे शब्द वापरले असतेस काय? अरे मी तुझा लंगोटी यार, हे ज्योतिष वैगरे इतरांना सांग. मला काय तुझे अगाध ज्ञान ठाऊक नाही ह्या विषयातले? अरे ते दुष्ट मनोगती मिपा बंद पाडणार हे तरी तुला ४ दिवस आधी सांगता आले का? उगाच का फोका मारतोस?"

Friday, December 12, 2008

चिखलफेक : तीन अंकी नाटक

आमच्या ब्लॉगवर 'पोपटस्वामी धोंड्या' अशी काहीशी टर उडवलेली असताना देखिल, संपादक धोंडूगुरुजींनीच आम्हाला पाठवले आहे हे तिन अंकी नाटक।

प्रमुख कलाकार:- मिपावरील ३ संपादक!
आणि सुत्रधार:- जनरल डायर :))))

धोंडूगुरुजींचे आम्ही आभारी आहोत.

*********सहर्ष सादर करीत आहोत तीन अंकी नाटक "चिखलफेक"**************


मिपावरील एका कमअक्कल संपादिकेशी आमचा झालेला सुखसंवाद... जो नंतर उडवून टाकण्यात आला। असो... यालाच आम्ही अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणणार आहोत. तात्याची आणीबाणी सर आँखोंपर.

आपला,(निष्ठावंत) धोंडोपंत.
(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)

आम्ही : मनोगतावर साहित्य आधी प्रकाशित करायचे आणि मग खरकटं इकडे टाकायचं याला काही अर्थ नाही। बांधिलकीचे मुद्दे असतील तर गोष्ट वेगळी.पण हा प्रकार चीड आणणारा आहे. आमचा अभिप्राय तुम्हाला रूचणार नाही याची कल्पना आहेच. कारण आमचे अभिप्राय कधीच रूचत नाहीत. त्यामुळे तुमच्या कवितेबद्दल आम्ही काहीही भाष्य केलेले नाही, आयुष्यात करणारही नाही. मागील अनुभवातून जो शिकत नाही तो गाढव. आम्ही त्यातले नाही. पण मिसळपावला जी सापत्नभावाची वागणूक मिळते त्यावर मात्र आम्ही तुटून पडूच पडू याबद्दल निर्धास्त रहा.

प्राजु: एकतर ही कविता मी २००७ च्या सप्टेबर महिन्यात लिहिलेली आहे जेव्हा मी मनोगतावर लेखन करत होते. कोणा एकाच्या प्रतिक्रियेमुळे ती इथे वरती आली हा दोष माझा नाही. त्यामुळे आपला बांधिलकीचा मुद्दा निकालात निघतो आहे. आणि मागील अनुभवावरून आपण शहाणे होताहात हे पाहून अंमळ आनंद झाला. मिसळपावला सापत्नभावाच्या वागणुकीबद्दल आपण न सांगितलेलंच बरं... ते मी आणि तात्या बघून घेऊ. धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्द्ल.


आम्ही: ते तुम्ही आणि तात्याच नाही, आम्हीपण बघतोच. इथे वस्तरा घेऊन नाही बसलो. जे जे गैर वाटेल त्याबद्दल बोलणारच. ( तुमच्या कविता सोडून.) आता पुरे करा. लईईईईईईईईईईईईईई नको. आज एवढचं बस्सं. (उजाले अपनी यादों के हमारे साथ ही रहने दो.... न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाये!)
विसोबा खेचर: पंत, इथे बांधिलकीचा वगैरे मुद्दा नाही। ही कविता बरीच जुनी आहे, जेव्हा प्राजू मनोगतावर लेखन करायची तेव्हाच्या काळात लिहिलेली आहे॥ही कविता इथे टाकून तिन मिपाला सापत्नभावाची वागणूक दिली आहे हा आपला आरोप मला चुकीचा वाटतो. प्राजू म्हणते त्याप्रमाणे बर्‍याच दिवसांनी या कवितेला प्रतिसाद दिला गेल्यामुळे ही जुनी कविता मुखपृष्ठावर आली आहे इतकंच! असो,
आपला, (पंतांचा आणि प्राजूचा मित्र) तात्या.

आम्ही: तात्या, तुमच्या वकिलीबद्दल धन्यवाद। पण इथे हे प्रकार आम्ही नेहमी पाहतो. आणि त्याला कायम विरोध करत राहू. कोण कोणाची कड घेतो याकडे दुर्लक्ष करून........... अगदी १००%मनोगताच्या संदर्भाची इथे आवश्यकताच नव्हती. सौभाग्यलेणे मिरविण्यासारखे त्यात काही नाही. आमच्या अनेक ग़ज़ला तिथे होत्या. पण तिथल्या अक्षता लावल्या की त्या पवित्र होतात हा दृष्टीकोण आम्ही कधी जोपासला नाही. पण मनोगताचे गोमूत्र शिंपडले की कविता देवघरात जाऊन बसते असा त्यांचा समज असावा.

प्राजु : देवघरात जाऊन बसत नसतील कदाचित... पण "ही कविता त्या तिथे वाचली आहे" असे टोमणे ज्येष्ठांकडून ऐकावे लागणार नाहीत हाच एक मुद्दा होता तेव्हा (१ सव्वा वर्षापूर्वी) जेव्हा मिपा सुरू होऊन फक्त १ च महिना झाला होता.

विसोबा खेचर: पण "ही कविता त्या तिथे वाचली आहे" असे टोमणे ज्येष्ठांकडून ऐकावे लागणार नाहीत हाच एक मुद्दा होता तेव्हा मुद्दा पटण्याजोगा आहे… मिपा अगदीच नवीन असतांना ही कविता इथे टाकली गेली होती, हा महत्वाचा मुद्दा पंतांनी विचारात घेतल्यास बरे होईल॥ आणि त्यानंतर प्राजूने जवळजवळ सर्व लेखन फक्त मिपावरच केले आहे हाही मुद्दा पंतांनी विचारात घ्यावा आणि हा विनाकाराण वाद थांबवावा अशी त्यांना विनंती…
आपला,
(डोक्याला आधीच बरेचसे ताप आणि टेन्शन्स असणारा) तात्या.

आम्हीः पण "ही कविता त्या तिथे वाचली आहे" असे टोमणे ज्येष्ठांकडून ऐकावे लागणार नाहीत हाच एक मुद्दा होता तेव्हा (१ सव्वा वर्षापूर्वी) जेव्हा मिपा सुरू होऊन फक्त १ च महिना झाला होता. लोक असले टोमणे मारतील हा निव्वळ भ्रम आहे. स्वत:च्या लेखनाबद्दलची भ्रामक अपेक्षा निर्देशित करणारा. लोकांनी असले टोमणे मारण्यासाठी कविता दीर्घकाळ मनावर कोरली जाईल अशी असावी लागते. म्हणजे दादांची " मल्मली तारूण्य माझे" किंवा " मालवून टाक दीप" अशा स्वरूपाची. जी युगानुयुगे लोकांच्या स्मरणात राहते. दोन मिनिटात विसरल्या जाणार्‍या कवितांच्या माथी हे टोमणे येत नाहीत. त्यामुळे वरील युक्तिवाद लंगडा आहे.

प्राजु:

>>दोन मिनिटात विसरल्या जाणार्‍या कवितांच्या माथी हे टोमणे येत नाहीत. हो..

आणि ज्या कविता स्त्री सभासदांना वाचतानाही लाज वाटेल आणि काही प्रतिक्रिया देण्याची इच्छा होणार नाही अशा.. संधीसाधू कविता मात्र चांगल्या लक्षात राहतात..

Monday, December 1, 2008

सोंग

दुनिया फाट्यावर मारलेल्या सरपंचांमध्ये हा बदल घडून आला की फाट्यावर मारण्याचे सोंग उघडे झाले... हे ज्याने त्याने ठरवावे
उदाहरणावरून एक महत्वाचा मुद्दा समोर येतो तो असा की मिपाकर कुठल्याही सामाजिक, राजकीय समस्येवर अगदी त्वरीत आपली मते नोंदवून हे संकेतस्थळ सामाजिक/राजकीय दृष्ट्या जागृत असल्याचाच प्रत्येय देतात. ही अत्यंत चांगलीच बाब आहे याबद्दल दुमत नाही..परंतु काही वेळेला कायद्याच्याही काही बाजू पाहाव्या लागतात.. खास करून मुंबईत अद्यापही संपूर्णपणे युद्धजन्य परिस्थिती असतांना काही गोष्टी सांभाळाव्या लागतात..या निमित्ताने मिपाचे आभासी अस्तित्व आणि त्या संदर्भातील कायद्याची बाजू किंवा एखादी व्यवसायिक लीगल टीम/सल्लामसलतकार सध्या तरी मिपाकडे नाहीत.. अर्थात, भविष्यात याचाही विचार अगदी अवश्य केला जाईल एवढीच ग्वाही सध्या देऊ इच्छितो..त्याचप्रमाणे एखाद्या वृत्तसमुहाइतकी ताकद आजतरी मिपाकडे नाही हाही एक मुद्दा आहे..त्यातूनही हे सर्व धागे पुरेसा कालावधी मिपावर होते आणि त्यावर अगदी भरभरून आणि महत्वाची चर्चा झाली होती हा मुद्दाही लक्षात घेतला पाहिजे..त्या दृष्टीने मी कृती करूया हा धागा सुरू केला आहे तो पाहून काय करता येईल यावर विचार करून प्रत्यक्ष कृती करण्यास सुरुवात करुया असे मला वाटते.आततायीपणेच विचार केला असता तर हा धागाही अप्रकाशित केला असता, परंतु तसे केलेले नाही हे सहज लक्षात यावे..!असो.. याहून अधिक कुठले स्पष्टीकरण मी देऊ शकेन असे मला वाटत नाही.. तरीही घेतलेल्या निर्णयबद्दल जर कुणाची काही असहमती असेल तर तूर्तास तरी मी फक्त त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करू शकतो..
-----
ह्या स्थळावार लिहिलेल्या मजकुराची जवाबदारी मिपाची नाही असा डिस्क्लेमर टाकलेला असताना देखिल सरपंचांचा हा धागे उडवण्याचा चावटपणा काय आहे समजले नाही. आज मिसळपाववर आणीबाणी आणुन जनरल डायर बनुन फुशारक्या मारत फिरणारे सरपंच भारतातही आणिबाणी लादली पाहिजे असली जाहिर विधाने करतात. हुकुमशाहीला चटावलेल्यांना लोकशाहीची किंमत काय कळाणार? मालक निष्ठेत मग्न असणारे श्वान मंडळ ह्याबाबतीत मात्र नेहेमीप्रमाणे हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवुन चुपचाप बसले आहे.