एक आटपाट नगर होते. नगर तसे संपन्न, नगराला लक्ष्मीचा आणि सरस्वतीचा वरदहस्त लाभला होता. खरेतर सरस्वतीने जरा सढळ हातानेच इथे खर्च केला होता. नगरात मोठा मोठे थोर कलाकार, वादक, लेखक, कवी, गायक, नकलाकार निवास करत होते. ह्या हरहुन्नरी लोकांना त्यांच्या राज्याबरोबरच बाहेरच्या राज्यात देखील मोठे नाव होते, सन्मान होता. ह्या अशा नगरात काही नगरकंटक देखील होते पण ते सुग्रास जेवणात मेथीचा खडा यावा इतपतच, आणि खरेतर आरोग्याला गरजेचे.
ह्या नगरात एक विदूषक राहायचा. आपली कामे सांभाळून झाली की मग नगराच्या मुख्य चौकात यावे आणि खेळाला सुरुवात करावी हा त्याचा नेहमीचा उद्योग. कधी नकला कर तर कधी विनोद सांग, कधी कोणाचे विडंबन करून लोकांना हसव अस त्याचा उद्योग, खरेतर छंदच म्हणाना. ह्या बदलात दोन कौतुकाचे बोल आणि पाठीवर एखादी शाबासकीची थाप ह्याशिवाय आधिक कसलीच अपेक्षा विदूषकाने केली नाही. आटपाट नगराचे नाव मोठे व्हावे, त्यात आपला थोडा हातभार लावावा अशीच कायम त्याची इच्छा.
एक दिवशी अचानक चक्रे फिरली आटपाट नगराच्या राजाला पदावरून पायऊतार व्हावे लागले. नवीन राजा सिंहासनावर आरूढ झाला. जुना राजा मोठा दर्दी, हरहुन्नरी. तोंडाचा थोडा फटकळ पण योग्य माणसाची कदर जाणणारा होता. स्वतः एक कलाकार असल्याने साहित्याची, कलेची जाण असणारा होता. नवीन राजा देखील मोठा हरहुन्नरी, कलेची जाण असणारा पण कामात व्यस्त असणारा होता. जुन्या राजाकडे एकाच राज्याची जबाबदारी होती मात्र नवीन राजाकडे अनेक राज्यांच्या जबाबदाऱ्या असल्याने नवीन राज्याला देण्यासाठी त्याच्याकडे पुरेसा वेळ उपलब्ध न्हवता. नवीन राज्याची घडी आपणाला हवी तशी बसवण्यासाठी मोकळा वेळ मिळेपर्यंत जुन्याच राजाच्या मंत्रिमंडळाकडे कारभार सोपवावा असे नवीन राजाने ठरवले. थोडेफार जुजबी बदल करून त्याचे जुन्याच मंत्र्यांकडे राज्याचा कारभार सोपवून टाकला. झाले इथेच एका दुष्टचक्राची सुरुवात झाली....
Wednesday, December 15, 2010
Sunday, August 1, 2010
जालगावातलं भूत - भाग २ (अंतिम)
"गुरुजी, तुम्ही?” एक ताठ पारंबी हलली. पारंबीवरच्या मल्लखांबातलं एक अनवट आसनसोडवून घेऊन ती व्यक्ती खाली उतरली.
"होय वत्सा मीच. जालिंदर जलालाबादी. सध्या मुक्कामपोस्ट जालगाव.”
मी शब्द ऐकत होतो, गुरुजींना समोर पाहात होतो. पण कानांवर, डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. पण चटकन भान राखून त्यांच्या पायावर लोळण घेतली.
"किती दिवसांनी गुरुजी... र्वांडानंतर आपण प्रथमच भेटतो आहोत.”
"नाही, त्या सभेत गोळीबार झाला, तेव्हा तू होतासच तिथेच.”
"होय. बुरुंडीतले ते दिवस कसे विसरेन? पण त्यावेळी आपली भेट अशी झाली नव्हती. तुमची अंत्ययात्रा काढली त्यात खांदा द्यायला तुमच्या शेजारी मीही होतोच की. आता पुन्हा तुम्हाला बघून इतका आनंद झाला म्हणून सांगू...”
"तो आनंद व्यक्त करण्यासाठीच तू अठरा मिनिटं उशीरा आलास, नाही का? का वाटेत ट्राफिक लागला वाटतं...पुण्यातला?" जालिंदरबाबांनी खवचटपणे विचारलं.
"क्षमा करा गुरुजी. माझी वाट चुकली.”
"हम्म्म्म चालायचंच. सगळ्यांच्याच वाटा चुकताहेत सध्या... पण इतका उशीर क्षम्य नाही.”
"चुकलं गुरुजी.”
"तुझी गणितं खूपच चुकताहेत सध्या. दोन मिनिटं लागायची तिथे तुला वीस मिनिटं लागली. दहा पटीने चुकलास.”
"खरं आहे गुरुजी.”
त्यांनी धुळीत एक पिंकेची चूळ टाकली. "हे आकडेवारीचं कसलं खूळ घेऊन बसला आहेस. असली भलती भूल पडू देऊ नकोस स्वतःवर. गाडी रुळावरून घसरू देऊ नकोस. तुझं कूळ विसरू नकोस. तुझ्या मूळ शक्तीस्थळांवर फोकस कर.. छे मला या ऊळाकारांताचा इतक्यातच कंटाळा आला. वीस वीस कोणी कसं सहन करतं कोण जाणे.”
"समजलो नाही गुरुजी.”
"अरे, गणितं करणं हा तुझा पिंड आहे का?”
"एके काळी होता गुरुजी. एके काळी माझं गणित चांगलं होतं.”
"पण आता नाही. हेच सिद्ध झालं ना? अरे, उंट तिरकाच चालतो, हत्ती सरळच जातो, घोडा अडीच घरं उड्या मारतो. उंटाला जर तू म्हटलंस सरळ जा, तर त्याला जमणारच नाही ते. पिंडच नाही त्याचा तो.”
जालिंदरबाबा कधीकधी गूढ आणि नाटकी बोलतात. कधी कधी नाटकी म्हणजे नाटकातली वाक्यच बोलतात.
"परवा कोणीतरी म्हटल्याप्रमाणे तू आपला पूर्णवेळ काव्यरसग्रहणाचा धंदा कर. माझी शिकवण लक्षात ठेव. त्या कवीतकचं पुढे काय झालं?”

Wednesday, July 7, 2010
जालगावातलं भूत - भाग १
जालगावातलं भूत - भाग १
प्रेषक राजेश घासकडवी ( मंगळ, 06/29/2010 - 02:19) .
* विनोद
* मुक्तक
* मौजमजा
* प्रकटन
>>>>>>
मंदिराच्या परिसरात उंच उंच झाडं होती. संध्याकाळच्या वेळी एक गूढ स्तब्धता होती . त्यातलं एक झाड विचित्र दिसत होतं. कोकणी मातीपेक्षाही लाल तपकिरी दिसत होतं. त्यांच्या शेंड्यावर काहीतरी हालचाल दिसत होती. काही लोक त्या झाडाखाली काहीतरी नेऊन ठेवत होती. कोकणातली भुतंएवढ्या भर संध्याकाळी झाडं हलवत बसतील अशी कल्पना नव्हती. मी मामाला त्याविषयी विचारलं.
"छे छे, ती भुतं कसली, ती साधी माकडं आहेत. खरं तर एकच माकड आहे, पण ते इतक्या पारंब्यांवरनं इकडून तिकडे उड्या मारतं की काय विचारता सोय नाही. गेले काही दिवस तर फारच उच्छाद मांडला आहे. आधी ते कुठल्या तरी आयटी कंपनीच्या बिल्डिंगवर काहीतरी करत बसलेलं असायचं. तिथे त्याचा मामा होता - हरमामा. त्या हरमामाच्या म्हणे ढुंगणात दात होते. याने हरमामाबरोबर काहीतरी वेडेवाकडे उद्योग केले तर हरमामा त्याला चावला. तेव्हापासून तिकडे जायचं सोडून दिलंय, आणि इकडे झाडावरच उड्या मारत बसलेलं असतं.”
"आणि ती पानं कशासाठी?”
"पानं होय. ती त्याला खाण्यासाठी.”
"इतकी पानं?”
"अरे, तो ती खात नाही. बघ ते झाड लाल लाल झालेलं दिसतंय ना? तो फक्त पिंका टाकतो.”
"मग त्याला पानं दिलीच नाहीत तर पिंका पडणारच नाहीत.”
"ते करून बघितलं लोकांनी. पिंका टाकता आल्या नाही तर तो उलट्या करतो. आणखी काय काय करतो. त्यापेक्षा हा लाल रंग परवडला.”
तितक्यात कोणीतरी गडी त्या झाडावरून उतरताना दिसला.
"तो माणूस काय करतोय?”
"तो नवीन दोरी बांधून आला. झाडावरच्या पारंब्या लाल लाल झाल्या की लोकं नवीन धागे बांधतात. हा त्यावरही पिंका टाकतो.”
"मग त्या माकडाला कोणी हाणत का नाही?”
"अरे त्याची पण एक गोष्ट आहे. हा पूर्वी अतिशय हुशार होता. झाडांवर आकर्षक उड्या मारून लोकांची करमणूक करायचा. त्याने हनुमानाची भक्ती केली. हनुमानाने त्याला वर दिला की तुला कोणीही कितीही हाणला तरी वेदना जाणवणार नाहीत. इतकंच काय तुला कोणी हाणतोय हे तुला समजणार देखील नाही. लोकांनी प्रयत्न केला पण कंटाळून गेले. आता मुकाट्याने त्याच्या पिंका सहन करतात. लोकं त्याच्या माकडचेष्टा पाहून हसतात. त्यांना खरंच गंमत वाटते असं त्याला वाटतं.”
"म्हणजे त्याची कातडी गेंड्याची आहे तर.”
"छे छे. गेंड्याची कातडी मऊ असते हे तुला माहीत नाही का? याला मिळालेला वर कातडीबाबत नाही - तो त्याच्या मेंदूसाठी आहे. त्याला हाणलेलं, जखमा झालेल्या लोकांना दिसतात, पण याला त्या वरपर्यंत पोचतच नाहीत. त्याची आणखीन गंमत म्हणजे तो कधीकधी स्वत:च दोरी बांधतो. आणि ती तुटून दाणकन आपटला की सगळ्यांना दोरी का तुटली म्हणून विचारत फिरतो. इतक्या हुशार कोणाचं असं झालेलं पाहून वाईट वाटतं. तोच एकटा 'सगळेच लाल करून घेतात. मीसुद्धा.' असं प्रामाणिकपणे म्हणतो. तो झाडच लाल करतो ती गोष्ट वेगळी. त्याच्या मूळच्या गुणांपोटी त्याच्यावर प्रेम करणारे देखील खूप आहेत. तो जेव्हा पूर्वीसारख्या उड्या मारून दाखवतो तेव्हा आजही शेकड्यांनी लोक बघायला जमतात, आणि टाळ्या वाजवतात. असो. चल. आपल्याला घरी जायची वेळ झाली.”
>>>>>

Friday, January 29, 2010
माझे संकेतस्थळाचे प्रयोग
नशीब सकाळ दररोज होते. वर्षातून एकदाच झाली असती तर "सकाळी" अंकसुद्धा निघाला असता....
खो खो खो, खी खी खी,
बाकी, देव साहेब ! तुम्ही शिमगा अंक काढाच. माझे लेखनाचे शिर्षक ठरले आहे. Smile
१) माझे संकेतस्थळाचे प्रयोग [राज जैन यांचे मनोगत]
२) मुझे घुस्सा क्यो आता है ! [अवलिया यांचे मनोगत]
-दिलीप बिरुटे
[बदमाश]
>>१) माझे
प्रेषक II राजे II ( गुरू, 01/28/2010 - 18:37) .
>>१) माझे संकेतस्थळाचे प्रयोग [राज जैन यांचे मनोगत]
स्वतःच्या खिश्याला चाट लावून आम्हाला असे पालथे धंदे करायची लहानपणापासूनच 'घाण' सवय आहे व इतरांना आपली खिल्ली उडवण्याचा मोका देण्याची पण... चालायचे ना आम्ही बदललो ना आमची सवय !
*
आज जे पण काही आहे मी त्यात ह्या असल्या प्रयोगांचाच खुप मोठा हात आहे हे खुप कमी जणांना माहीत आहे.
असो,
आम्ही नाही बदलणार.
आज उपास तुमच्यामुळे तुटला. Sad
राज जैन
( महा-बदमाश )
२) मुझे
नवीन
प्रेषक अवलिया ( गुरू, 01/28/2010 - 18:47) .

हा हा हा
तुम्ही लेख लिहा आणि टाका.. प्रतिसाद द्यायला बाकीचे आमच्या लेखाला कधीही प्रतिसाद न देणारे, किंवा नाकं मुरडणारे, एरंडेल पिवुन लंबुळके तोंड करणारे सदस्य, संपादक आहेतच. कारण काही वयोवृद्धांच्या मते आम्ही ज्या कंपुत होतो, आहोत तो सध्या दिसत नाही. तसेही सध्या आम्ही लेख, प्रतिसाद लिहित नसल्याने वय वाढलेल्या बालकांच्या आणि संपादकांच्या डोक्याला तशी शांतता आहेच. बाकी जास्त टवाळ्या न करता लिहा बर का ... नाहीतर तुमचे पण संपादकांशी फाटायचे.
तुम्ही जीमेलवर कळवले म्हणुन प्रवेश करुन प्रतिसाद दिला आणि उपास मोडला. आता प्रायश्चित घेतो
--अवलिया

Subscribe to:
Posts (Atom)