मिसळभोक्ता लिहितात..

हे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना "भां*त", आणि "बा*वला तिच्यायला" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे!

धन्य तात्या ! आणि धन्य तो अनाम म्हातारा !


Sunday, August 1, 2010

जालगावातलं भूत - भाग २ (अंतिम)

"गुरुजी, तुम्ही?” एक ताठ पारंबी हलली. पारंबीवरच्या मल्लखांबातलं एक अनवट आसनसोडवून घेऊन ती व्यक्ती खाली उतरली.
"होय वत्सा मीच. जालिंदर जलालाबादी. सध्या मुक्कामपोस्ट जालगाव.”

मी शब्द ऐकत होतो, गुरुजींना समोर पाहात होतो. पण कानांवर, डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. पण चटकन भान राखून त्यांच्या पायावर लोळण घेतली.
"किती दिवसांनी गुरुजी... र्वांडानंतर आपण प्रथमच भेटतो आहोत.”
"नाही, त्या सभेत गोळीबार झाला, तेव्हा तू होतासच तिथेच.”
"होय. बुरुंडीतले ते दिवस कसे विसरेन? पण त्यावेळी आपली भेट अशी झाली नव्हती. तुमची अंत्ययात्रा काढली त्यात खांदा द्यायला तुमच्या शेजारी मीही होतोच की. आता पुन्हा तुम्हाला बघून इतका आनंद झाला म्हणून सांगू...”
"तो आनंद व्यक्त करण्यासाठीच तू अठरा मिनिटं उशीरा आलास, नाही का? का वाटेत ट्राफिक लागला वाटतं...पुण्यातला?" जालिंदरबाबांनी खवचटपणे विचारलं.
"क्षमा करा गुरुजी. माझी वाट चुकली.”
"हम्म्म्म चालायचंच. सगळ्यांच्याच वाटा चुकताहेत सध्या... पण इतका उशीर क्षम्य नाही.”
"चुकलं गुरुजी.”
"तुझी गणितं खूपच चुकताहेत सध्या. दोन मिनिटं लागायची तिथे तुला वीस मिनिटं लागली. दहा पटीने चुकलास.”
"खरं आहे गुरुजी.”
त्यांनी धुळीत एक पिंकेची चूळ टाकली. "हे आकडेवारीचं कसलं खूळ घेऊन बसला आहेस. असली भलती भूल पडू देऊ नकोस स्वतःवर. गाडी रुळावरून घसरू देऊ नकोस. तुझं कूळ विसरू नकोस. तुझ्या मूळ शक्तीस्थळांवर फोकस कर.. छे मला या ऊळाकारांताचा इतक्यातच कंटाळा आला. वीस वीस कोणी कसं सहन करतं कोण जाणे.”
"समजलो नाही गुरुजी.”
"अरे, गणितं करणं हा तुझा पिंड आहे का?”
"एके काळी होता गुरुजी. एके काळी माझं गणित चांगलं होतं.”
"पण आता नाही. हेच सिद्ध झालं ना? अरे, उंट तिरकाच चालतो, हत्ती सरळच जातो, घोडा अडीच घरं उड्या मारतो. उंटाला जर तू म्हटलंस सरळ जा, तर त्याला जमणारच नाही ते. पिंडच नाही त्याचा तो.”
जालिंदरबाबा कधीकधी गूढ आणि नाटकी बोलतात. कधी कधी नाटकी म्हणजे नाटकातली वाक्यच बोलतात.
"परवा कोणीतरी म्हटल्याप्रमाणे तू आपला पूर्णवेळ काव्यरसग्रहणाचा धंदा कर. माझी शिकवण लक्षात ठेव. त्या कवीतकचं पुढे काय झालं?”