मिसळभोक्ता लिहितात..

हे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना "भां*त", आणि "बा*वला तिच्यायला" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे!

धन्य तात्या ! आणि धन्य तो अनाम म्हातारा !


Wednesday, July 7, 2010

जालगावातलं भूत - भाग १

जालगावातलं भूत - भाग १
प्रेषक राजेश घासकडवी ( मंगळ, 06/29/2010 - 02:19) .

* विनोद
* मुक्तक
* मौजमजा
* प्रकटन

>>>>>>
मंदिराच्या परिसरात उंच उंच झाडं होती. संध्याकाळच्या वेळी एक गूढ स्तब्धता होती . त्यातलं एक झाड विचित्र दिसत होतं. कोकणी मातीपेक्षाही लाल तपकिरी दिसत होतं. त्यांच्या शेंड्यावर काहीतरी हालचाल दिसत होती. काही लोक त्या झाडाखाली काहीतरी नेऊन ठेवत होती. कोकणातली भुतंएवढ्या भर संध्याकाळी झाडं हलवत बसतील अशी कल्पना नव्हती. मी मामाला त्याविषयी विचारलं.
"छे छे, ती भुतं कसली, ती साधी माकडं आहेत. खरं तर एकच माकड आहे, पण ते इतक्या पारंब्यांवरनं इकडून तिकडे उड्या मारतं की काय विचारता सोय नाही. गेले काही दिवस तर फारच उच्छाद मांडला आहे. आधी ते कुठल्या तरी आयटी कंपनीच्या बिल्डिंगवर काहीतरी करत बसलेलं असायचं. तिथे त्याचा मामा होता - हरमामा. त्या हरमामाच्या म्हणे ढुंगणात दात होते. याने हरमामाबरोबर काहीतरी वेडेवाकडे उद्योग केले तर हरमामा त्याला चावला. तेव्हापासून तिकडे जायचं सोडून दिलंय, आणि इकडे झाडावरच उड्या मारत बसलेलं असतं.”
"आणि ती पानं कशासाठी?”
"पानं होय. ती त्याला खाण्यासाठी.”
"इतकी पानं?”
"अरे, तो ती खात नाही. बघ ते झाड लाल लाल झालेलं दिसतंय ना? तो फक्त पिंका टाकतो.”
"मग त्याला पानं दिलीच नाहीत तर पिंका पडणारच नाहीत.”
"ते करून बघितलं लोकांनी. पिंका टाकता आल्या नाही तर तो उलट्या करतो. आणखी काय काय करतो. त्यापेक्षा हा लाल रंग परवडला.”
तितक्यात कोणीतरी गडी त्या झाडावरून उतरताना दिसला.
"तो माणूस काय करतोय?”
"तो नवीन दोरी बांधून आला. झाडावरच्या पारंब्या लाल लाल झाल्या की लोकं नवीन धागे बांधतात. हा त्यावरही पिंका टाकतो.”
"मग त्या माकडाला कोणी हाणत का नाही?”
"अरे त्याची पण एक गोष्ट आहे. हा पूर्वी अतिशय हुशार होता. झाडांवर आकर्षक उड्या मारून लोकांची करमणूक करायचा. त्याने हनुमानाची भक्ती केली. हनुमानाने त्याला वर दिला की तुला कोणीही कितीही हाणला तरी वेदना जाणवणार नाहीत. इतकंच काय तुला कोणी हाणतोय हे तुला समजणार देखील नाही. लोकांनी प्रयत्न केला पण कंटाळून गेले. आता मुकाट्याने त्याच्या पिंका सहन करतात. लोकं त्याच्या माकडचेष्टा पाहून हसतात. त्यांना खरंच गंमत वाटते असं त्याला वाटतं.”
"म्हणजे त्याची कातडी गेंड्याची आहे तर.”
"छे छे. गेंड्याची कातडी मऊ असते हे तुला माहीत नाही का? याला मिळालेला वर कातडीबाबत नाही - तो त्याच्या मेंदूसाठी आहे. त्याला हाणलेलं, जखमा झालेल्या लोकांना दिसतात, पण याला त्या वरपर्यंत पोचतच नाहीत. त्याची आणखीन गंमत म्हणजे तो कधीकधी स्वत:च दोरी बांधतो. आणि ती तुटून दाणकन आपटला की सगळ्यांना दोरी का तुटली म्हणून विचारत फिरतो. इतक्या हुशार कोणाचं असं झालेलं पाहून वाईट वाटतं. तोच एकटा 'सगळेच लाल करून घेतात. मीसुद्धा.' असं प्रामाणिकपणे म्हणतो. तो झाडच लाल करतो ती गोष्ट वेगळी. त्याच्या मूळच्या गुणांपोटी त्याच्यावर प्रेम करणारे देखील खूप आहेत. तो जेव्हा पूर्वीसारख्या उड्या मारून दाखवतो तेव्हा आजही शेकड्यांनी लोक बघायला जमतात, आणि टाळ्या वाजवतात. असो. चल. आपल्याला घरी जायची वेळ झाली.”
>>>>>