मिसळभोक्ता लिहितात..

हे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना "भां*त", आणि "बा*वला तिच्यायला" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे!

धन्य तात्या ! आणि धन्य तो अनाम म्हातारा !


Wednesday, December 15, 2010

विदूषक

एक आटपाट नगर होते. नगर तसे संपन्न, नगराला लक्ष्मीचा आणि सरस्वतीचा वरदहस्त लाभला होता. खरेतर सरस्वतीने जरा सढळ हातानेच इथे खर्च केला होता. नगरात मोठा मोठे थोर कलाकार, वादक, लेखक, कवी, गायक, नकलाकार निवास करत होते. ह्या हरहुन्नरी लोकांना त्यांच्या राज्याबरोबरच बाहेरच्या राज्यात देखील मोठे नाव होते, सन्मान होता. ह्या अशा नगरात काही नगरकंटक देखील होते पण ते सुग्रास जेवणात मेथीचा खडा यावा इतपतच, आणि खरेतर आरोग्याला गरजेचे.

ह्या नगरात एक विदूषक राहायचा. आपली कामे सांभाळून झाली की मग नगराच्या मुख्य चौकात यावे आणि खेळाला सुरुवात करावी हा त्याचा नेहमीचा उद्योग. कधी नकला कर तर कधी विनोद सांग, कधी कोणाचे विडंबन करून लोकांना हसव अस त्याचा उद्योग, खरेतर छंदच म्हणाना. ह्या बदलात दोन कौतुकाचे बोल आणि पाठीवर एखादी शाबासकीची थाप ह्याशिवाय आधिक कसलीच अपेक्षा विदूषकाने केली नाही. आटपाट नगराचे नाव मोठे व्हावे, त्यात आपला थोडा हातभार लावावा अशीच कायम त्याची इच्छा.

एक दिवशी अचानक चक्रे फिरली आटपाट नगराच्या राजाला पदावरून पायऊतार व्हावे लागले. नवीन राजा सिंहासनावर आरूढ झाला. जुना राजा मोठा दर्दी, हरहुन्नरी. तोंडाचा थोडा फटकळ पण योग्य माणसाची कदर जाणणारा होता. स्वतः एक कलाकार असल्याने साहित्याची, कलेची जाण असणारा होता. नवीन राजा देखील मोठा हरहुन्नरी, कलेची जाण असणारा पण कामात व्यस्त असणारा होता. जुन्या राजाकडे एकाच राज्याची जबाबदारी होती मात्र नवीन राजाकडे अनेक राज्यांच्या जबाबदाऱ्या असल्याने नवीन राज्याला देण्यासाठी त्याच्याकडे पुरेसा वेळ उपलब्ध न्हवता. नवीन राज्याची घडी आपणाला हवी तशी बसवण्यासाठी मोकळा वेळ मिळेपर्यंत जुन्याच राजाच्या मंत्रिमंडळाकडे कारभार सोपवावा असे नवीन राजाने ठरवले. थोडेफार जुजबी बदल करून त्याचे जुन्याच मंत्र्यांकडे राज्याचा कारभार सोपवून टाकला. झाले इथेच एका दुष्टचक्राची सुरुवात झाली....