मिसळभोक्ता लिहितात..

हे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना "भां*त", आणि "बा*वला तिच्यायला" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे!

धन्य तात्या ! आणि धन्य तो अनाम म्हातारा !


Thursday, April 30, 2009

जंक्शन

ही बघा मिसळपावच्या मस्तवाल संपादक मंडळाने नाकारलेली माझी कविता

जंक्शन
कुण्या सकाळी कवि खरडतो
मारुनमुटकुन कविता एक
जुन्या कल्पना घासुनिपुसुनि
फेक जरा तू पुन्हा फेक

मोर म्हणजे काय हो बाबा
पोर विचारी बापाला
मोर भारी शिग्रेट असते
बाप खेकसे पोराला

"केतकीचे बन कोठे असते..?
सांगानाहो मजला बाबा"
केतकी आता म्हातारी झाली
तुझी तू दुसरी शोध ना बाबा

खाडकन मग बाबा बघतो ,
काय वाचतो अपुले पोर.
काय? 'हैदोस' तुझ्या हातात?
बापापेक्षा पोरच थोर

खसकन बाप ओढुनी घेतो ,
पुस्तक त्याच्या हातातले.
बाबा आता काय उपयोग?
तुम्ही तर राळे सुपातले

"बेटा ! जुन्या माणसांच्या रे,
जुनाट असती या समजुती
ऍन्ड्रोपॉज निव्वळ थाप
अजुनि कणखर बघ प्रकृती

"कुणी पाहिला मोर नाचरा..?
कुणी ऐकले ककीळ कुंजन..?
चौफुल्यावर दौलतजादा
बाई असली झकास जंक्शन

"पुर्वीची ती माणसे पोरा
खुप खुप मागस होती
'केसरी' च्या सेकंड हनीमूनला
वायग्रा घेऊन जात होती

"भात म्हणुनी तांदुळ अख्खा
शिजवुनी ते होते खात
चाळीशीतल्या मधुमेहाने
लिबिडोचीही लागे वाट

"आता कशी बघ आपण
जेवण म्हणुनी खातो गोळी
मुक्त नागवे सगळे आपण
कुठली साडी कुठली चोळी

"बाबा मजला सांगा कसे हो
इंद्रधनु ते फुले आकाशी..?"
कसली पुचाट तुझी जवानी
स्वप्नी मल्लीका, मिठीत उशी

"झोप आता पोरा गुपचुप
रात्र खुप बघ आहे झाली . "
डोकेदुखी नसे आईला
अशी रात्र वर्षाने आली

बाप लेकाचा हा संवाद,
माय ऐकतसे कवतुके .
ओठ चावला दाताखाली
मुठीत 'आय पिल' चे पुडके

असे बोलुनी पोरा तीने,
जरा -जारासे थोपटले .
बाबा मोकळे होऊन आले
बाथ्रुममधला फ्लश बोले

नवरा वदे बायकोला मग,
"नको गं ऐसे गीत गाऊ ,
जरा झोपु दे त्याला आणिक
आपण भक्त प्रल्हाद पाहू

पोर म्हणे, "बाबा.. बाबा
गाऊ द्या ना तिला जरा ,
बाबा म्हणती तुमचे चालू द्या
हात काँग्रेसचा मजला बरा

"खर्च वाचेल गोळ्यांचा अन
पैसेही साठतील खुप
बाबा हाती धुपाटणे अन
गेले तेल अन गेले तूप

बोल ऐकुनी पोराचे ,
पाणावले नयन आईचे .
झोपत नाही हा कार्टा तर
पहावे एपिसोड सिरियलचे

बघुनी पाणी डोळ्यां मधले
पोर जरासे बावरते
बाबा आता घोरत दीर्घ
आईलाही जांभई येते

माय म्हणे , "माझ्या पोरा
हा मायेचा वाही झरा ,
झोप जगाला आणण्यासाठी
असल्या पुचाट कविता करा

- वस्तुनिष्ठ