मिसळभोक्ता लिहितात..

हे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना "भां*त", आणि "बा*वला तिच्यायला" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे!

धन्य तात्या ! आणि धन्य तो अनाम म्हातारा !


Wednesday, July 7, 2010

जालगावातलं भूत - भाग १

जालगावातलं भूत - भाग १
प्रेषक राजेश घासकडवी ( मंगळ, 06/29/2010 - 02:19) .

* विनोद
* मुक्तक
* मौजमजा
* प्रकटन

>>>>>>
मंदिराच्या परिसरात उंच उंच झाडं होती. संध्याकाळच्या वेळी एक गूढ स्तब्धता होती . त्यातलं एक झाड विचित्र दिसत होतं. कोकणी मातीपेक्षाही लाल तपकिरी दिसत होतं. त्यांच्या शेंड्यावर काहीतरी हालचाल दिसत होती. काही लोक त्या झाडाखाली काहीतरी नेऊन ठेवत होती. कोकणातली भुतंएवढ्या भर संध्याकाळी झाडं हलवत बसतील अशी कल्पना नव्हती. मी मामाला त्याविषयी विचारलं.
"छे छे, ती भुतं कसली, ती साधी माकडं आहेत. खरं तर एकच माकड आहे, पण ते इतक्या पारंब्यांवरनं इकडून तिकडे उड्या मारतं की काय विचारता सोय नाही. गेले काही दिवस तर फारच उच्छाद मांडला आहे. आधी ते कुठल्या तरी आयटी कंपनीच्या बिल्डिंगवर काहीतरी करत बसलेलं असायचं. तिथे त्याचा मामा होता - हरमामा. त्या हरमामाच्या म्हणे ढुंगणात दात होते. याने हरमामाबरोबर काहीतरी वेडेवाकडे उद्योग केले तर हरमामा त्याला चावला. तेव्हापासून तिकडे जायचं सोडून दिलंय, आणि इकडे झाडावरच उड्या मारत बसलेलं असतं.”
"आणि ती पानं कशासाठी?”
"पानं होय. ती त्याला खाण्यासाठी.”
"इतकी पानं?”
"अरे, तो ती खात नाही. बघ ते झाड लाल लाल झालेलं दिसतंय ना? तो फक्त पिंका टाकतो.”
"मग त्याला पानं दिलीच नाहीत तर पिंका पडणारच नाहीत.”
"ते करून बघितलं लोकांनी. पिंका टाकता आल्या नाही तर तो उलट्या करतो. आणखी काय काय करतो. त्यापेक्षा हा लाल रंग परवडला.”
तितक्यात कोणीतरी गडी त्या झाडावरून उतरताना दिसला.
"तो माणूस काय करतोय?”
"तो नवीन दोरी बांधून आला. झाडावरच्या पारंब्या लाल लाल झाल्या की लोकं नवीन धागे बांधतात. हा त्यावरही पिंका टाकतो.”
"मग त्या माकडाला कोणी हाणत का नाही?”
"अरे त्याची पण एक गोष्ट आहे. हा पूर्वी अतिशय हुशार होता. झाडांवर आकर्षक उड्या मारून लोकांची करमणूक करायचा. त्याने हनुमानाची भक्ती केली. हनुमानाने त्याला वर दिला की तुला कोणीही कितीही हाणला तरी वेदना जाणवणार नाहीत. इतकंच काय तुला कोणी हाणतोय हे तुला समजणार देखील नाही. लोकांनी प्रयत्न केला पण कंटाळून गेले. आता मुकाट्याने त्याच्या पिंका सहन करतात. लोकं त्याच्या माकडचेष्टा पाहून हसतात. त्यांना खरंच गंमत वाटते असं त्याला वाटतं.”
"म्हणजे त्याची कातडी गेंड्याची आहे तर.”
"छे छे. गेंड्याची कातडी मऊ असते हे तुला माहीत नाही का? याला मिळालेला वर कातडीबाबत नाही - तो त्याच्या मेंदूसाठी आहे. त्याला हाणलेलं, जखमा झालेल्या लोकांना दिसतात, पण याला त्या वरपर्यंत पोचतच नाहीत. त्याची आणखीन गंमत म्हणजे तो कधीकधी स्वत:च दोरी बांधतो. आणि ती तुटून दाणकन आपटला की सगळ्यांना दोरी का तुटली म्हणून विचारत फिरतो. इतक्या हुशार कोणाचं असं झालेलं पाहून वाईट वाटतं. तोच एकटा 'सगळेच लाल करून घेतात. मीसुद्धा.' असं प्रामाणिकपणे म्हणतो. तो झाडच लाल करतो ती गोष्ट वेगळी. त्याच्या मूळच्या गुणांपोटी त्याच्यावर प्रेम करणारे देखील खूप आहेत. तो जेव्हा पूर्वीसारख्या उड्या मारून दाखवतो तेव्हा आजही शेकड्यांनी लोक बघायला जमतात, आणि टाळ्या वाजवतात. असो. चल. आपल्याला घरी जायची वेळ झाली.”
>>>>>

12 comments:

Anonymous said...

त्या टार्याला बुडावर लाथ मारुन हाकलले हे बरेच झाले. बाकरवडी वगैरे सदस्यांना कंपूबाजी करुन पळवून लावणार्या ह्या माकडाला कंपूनेच ठेचून काढले. नको तिथे बोट घालून वास घेत असतो लेकाचा आता बस संपादकांची चाटत.

Anonymous said...

टारूशेठ कुठे गेले?
प्रेषक सविता ( शनी, 07/10/2010 - 11:39) .

* मुक्तक
* प्रकटन

तशी मी मिपावर वाचनमात्र च!!

पण ठराविक १०-१२ लोकांचे लेख आणि प्रतिक्रिया वाचायला इथे दिवसातून एकदा तरी हमखास फेरी असतेच!!!!

७-८ महिने हे चालूच आहे.....

टारू शेठ चे लेख आणि त्यांच्या प्रतिक्रिया हे माझे असेच आवडते....

तीन चार दिवस त्यांचा ना काही लेख वाचला... ना कुठल्या लेखावर प्रतिक्रिया... म्हणून त्यांच्या ब्लॉग वर गेले... तर कळले... त्यांचा आयडी ब्लॉक झालाय.....

मान्य ते लोकांना जरा जास्त चिमटे घेतात... खिल्ली उडवतात.... पण तुम्ही आंतर्जालावर लिहिताय तर कोणी प्रशंसा करणार, कोणीतरी टिका करणार.. कोणी खिल्ली ऊडवणार हे साहजिकच आहे. हे ज्यांना झेपत नाही त्यांनी लेखन करू नये हे माझे स्पष्ट मत आहे....

मिपावर फक्त वाचनमात्र असणारे किती लोक... टारू, अवालिया,परा ,विक्षिप्त आदिती, चतुरंग, सहज,पंगा ... अन अशा काही लोकांचे लेख आणि प्रतिक्रिया वाचण्यासाठीच येतात....

जरा खोडी काढली ...की कर आयडी ब्लॉक.... हे काही बरोबर नाही....

असं आपलं मला वाटतं.

-सविता.

Anonymous said...

निवेदन.
प्रेषक संपादक मंडळ ( शनी, 07/10/2010 - 11:59) .

नमस्कार,

संपादक मंडळास कळवण्यास खेद होतो की मंडळातर्फे वारंवार सूचना देऊन आणि विनंती केल्यानंतरही अवांतर आणि अनावश्यक प्रतिसाद लिहिणे, इतर सदस्यांवर व्यक्तिगत रोखाचे लेखन करणे, संपादक आणि संकेतस्थळ चालकांविषयी अनाठायी नाराजी प्रकट करणे आणि संकेतस्थळाचे वातावरण बिघडवणे अशा अनेक गोष्टींना आळा न बसल्याने 'टारझन' आणि '||विकास||' या सदस्यांचे सदस्याधिकार आज काढून घेण्यात आले आहेत.

अशाच प्रकारचे लेखन न करण्याची विनंती आणि सूचना इतर काही सदस्यांनाही करण्यात आली आहे. त्यांच्या वर्तणूकीत सुधारणा होईल अशी आशा संपादक मंडळाला वाटते.

मिसळपाव सदस्यांवर लेखन करताना अपमानास्पद, सांसदिय भाषेस सोडून केलेले लेखन, सार्वजनिक शिष्टाचारांना सोडून केलेले लेखन, अश्लील शब्दांचा/ चित्रांचा वापर असलेले साहित्य, सदस्यांमधले वैयक्तिक हेवेदावे, जुने हिशेब चुकते करणे (score settling) प्रकारातील प्रतिसाद किंवा लेख लिहणारे सदस्यांना तसे न करण्याची विनंती करण्यात येत आहे.
सदर प्रकार वारंवार आढळल्यास इथे जाहिर केल्याप्रमाणे कारवाई करण्याचा अधिकार संपादक मंडळाला राहिल.
सदस्यांकडुन सहकार्याची अपेक्षा आहे ....

वारंवार सूचना/ ताकीद देऊनही एखाद्या सदस्याचा खोडसाळपणा दिसून येत असेल तर विशिष्ट कालावधीसाठी व्य.नि. आणि खरडवहीची सुविधा काढून घेण्याचे अधिकार संपादक मंडळाला आहेत. या उपायानंतरही सदस्याच्या वागणूकीत सुधारणा नसल्यास सदस्याचे खाते बंद होऊ शकते ह्याची कृपया नोंद घ्यावी.

धन्यवाद,
संपादक मंडळ

Anonymous said...

मिसळप्रेमी ब्लॉग परत सुरु झाल्या बद्दल अभिनंदन!!

तर्रीखान said...

छोटा डॉन नावाचा आगलाव्या कपटी माणूस जो परेंत मिपाचा संपादक आहे तो परेंत मिपा सुधारणार नाही.

सोळा संपादकांपैकी एक said...

डान्याने लेनचा लेख पण उडवायला लावला..मुक्तसुनितने भांडण करुन तो परत आणला.

सहजच said...

चांगली जिरली त्या डान्याची. लेख पुन्हा प्रकाशित करावा लागला. अता शेफारला आहे संपादक झाल्यापासून. सुरुवातीला विजूभाऊंना फोन करुन रडायचा ते विसरलेला दिसतो.

Anonymous said...

आयला त्या डान्यालाच कशाला शिव्या द्या...सोळाच्या सोळा संपादक आंतरजालावरच्या गणिका आहेत. एकाचाही (पाठीचा कणा) ताठ नाही.

Anonymous said...

टार्‍याच्या विनंती वरून...

प्रेषक मनिष ( शनी, 07/10/2010 - 22:36) .
हे ठिकाण
धोरण
हा लेख टार्‍याने (टारझन याने) लिहिला आहे आणि त्याच्या विनंतीवरून मी इथे पेस्ट केला आहे. मी फक्त निरोप्या.

- (निरोप्या) मनिष

णमस्कार्स मायबाप मिपाकर/संपादकहो ,

आत्ताच प्रभ्यानं लिंक दिल्यावर हा धागा वाचला.

माझा आय.डी. बॅन झाल्याचं मला काही एक दु:ख नाही. पण मी मिपाकंटक आहे , मिपाचे नियम धुडकाऊन मनमानी करतोय इत्यादी गोष्टी मला बिकलुक मान्य नाहीत. आणि मी जाण्याचं कारण त्या गोष्टी ठराव्यात हे देखील मला रुचणारं नाही. वर संपादक मंडळाने लिहीलंय
१.केल्यानंतरही अवांतर आणि अनावश्यक प्रतिसाद लिहिणे,
=> अवांतर प्रतिसाद "ॐ" च्या अस्तित्वापुर्वीपासुन चालत आलेले आहेत, तसेच अनावश्यक प्रतिसाद हे ज्याच्या त्याच्या विचारसरणीने ठरतात ,त्यामुळे हा मुद्दा आय.डी. उडण्यासाठी गैरलागु ठरतो.

२.इतर सदस्यांवर व्यक्तिगत रोखाचे लेखन करणे,
=> "ॐ" नंतर जेंव्हा विश्वाची निर्मीती झाली, आणि ब्रम्हदेवानं सृष्टी निर्माण केली ,व्यक्ति निर्माण केल्या , तेंव्हापासुन व्यक्त्तिगत बाबी अस्तित्वात आहेत. त्यामुळे एकट्या टारझन ने व्यक्तिगत रोखाचं लिहीलंय आणि म्हणुन त्याचा आय.डी.बॅन केला आहे , हा मुद्दा केवळ हस्यास्पद वाटतो.

Anonymous said...

३. संपादक आणि संकेतस्थळ चालकांविषयी अनाठायी नाराजी प्रकट करणे
=> संकेतस्थळ चायनिज विचारसणीचे झाले आहे. चिन मधे सरकार विरुद्ध ब्र जरी काढला तरी तुरुंगात डांबतात. तसेच "अनाठायी" हा शब्द माझ्या बाबतीत मला "अनाठायी" च वाटला. नाराजी प्रकट करणे "अनाठायी" कसे असु शकते? शिवाय गोष्टी पटल्या नाही की नाराजी प्रकट होते आणि नाराजी प्रकट झाली की आय.डी. डिलीट होतो हा देखील हस्यास्पद वाटणारा मुद्दा आहे. हे संकेतस्थळ चालक कोण? जर "निलकांत" असेल तर निलकांत विषयी नाराजीचा सुर कोणाला कुठुन ऐकु आले ? निलकांतवर कुठल्याश्या साईटवर कोणीतरी वाकडी आणि मुद्दाम कमेंट टाकली होती तर तिकडे मी स्वता जाऊन त्यांना मिरीलाडु खाऊ घालुन आलो होतो.

४. आणि संकेतस्थळाचे वातावरण बिघडवणे
मी काही बोलत नाही , मी वातावरण बिघडवतो की बनवतो ? धाग्यावरचे प्रतिसाद पुरेसे आहेत हे सांगायला !

पण तरीही, संपादक मंडळाच्या निर्णयाचा मला मान आहे. टारझन मिसळपाव वर आल्यापासुन जसा होता , तसाच परवा पर्यंत होता. बदल झालाय तो म्यानेजमेंटच्या दृष्टीकोणात. आणि त्यामुळेच हे कन्फ्लिक्ट उडत आहेत. मी यापुर्वीही कुठेसं णमुद केलंय साईट चर येण्याचा माझा उद्देश केवळ मजा आहे. त्यामुळे साईटचं वातावरण दुषित करणे ,कोणाला व्यक्तिगत बोलणे ( बर्‍याच जणांच्या (इन्क्लुडींग पाध्ये ) हे लक्षात येत नाही, की मी केलेली मस्करी ही "आयडी" लिमीटेड आहे, कोणत्या सदस्याला आई-बहिणींवरुन किंवा अश्लिल शिव्या देऊन , किंवा त्याच्या शारिरीक व्यंगावरुन किंवा त्याच्या आर्थिक/मानसिक परिस्थितीवरुन मी कधीच कमेंट्स केल्या नाहित. जे काही चिमटे काढणे चालु असते ते केवळ त्या आय.डी. ने केलेल्या लिखाणावर. ) "अनाठायी" नाराजीचे सुर काढणे इत्यादी गोष्टी माझ्या खिजगणतीतही नाहीत. इतके असुनही जर आय.डी. ब्लॉक झाला तर त्याला "माझा वावर " हे कारण नसुन दुसरंच काही कारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. "धडाडीच्या आणि निर्भिड" संपादक मंडळाकडुन तसा स्पष्ट प्रतिसाद यायला हवा होता. जर खरोखर पारदर्शकता हवी आहेत तर हे असले मेंढीकोट काय म्हणुन ?

या धाग्यावर "टारझन" वर मनापासुन प्रेम केलेले प्रतिसाद पाहुन उर भरुन आला आहे. मिसळपाव वरच्या आमच्या २+ वर्षाच्या कारकिर्दीत आम्ही काय कमवले ? म्हणुन विचारले तर किमान हे सांगु शकु मला संपादक/ संपादक मंडळ , मिपाचालक , मिपामालक ह्यांच्या वर कसलाही आकस नाही. द्वेषही नाही. मिपावरुन मी फक्त पॉझिटिव्ह घेऊन चाललो आहे. ह्या पेक्षा कोणाच्या अपेक्षा काय असाव्यात ?

पुन्हा एकदा नमुद करतो , टारझन पुर्वीपासुन तोच आहे , अलिकडे धोरणं बदलली , दृष्टीकोण बदलला, त्यात मी फिट बसत नाही असं संपादक मंडळाला वाटतंय म्हणुन आज मी डिलीट झालोय. मे बी आय डिझर्व धिस. कवटी म्हंटला त्यातही तथ्य आहे. मी परत आलो तरी आहे तसाच वागणार, मी बदलावं कोणासाठी ? आणि का?

संस्थळ मालक निलकांत हा माझा अतिशय चांगला मित्र आहे , त्याला मी फार पुर्वीपासुन ओळखतो. तो अत्यंत संयमी,म्याच्युअर्ड आणि हुषार आहे.अनेक संपादकांना मी व्यक्तिश: ओळखतो त्यांनी कधीही निर्णय करताना बायस्डपणा केलेला नाही. मिसळपाव म्हणजे "टारझन" नाही , मिसळपाव होतं म्हणुन "टारझन" जन्मला. तेंव्हा कृपया संपादकांच्या / मालकांच्या सुचनांचा आदर राहु द्या. पटलं तर रहा, अन्यथा आमच्या सारखी ढुंगणावर लाथ बसण्या आधी स्वतः चालु पडा.

मिपा , मिपाकर आणि सगळ्यांना शुभेच्छा !!

टिप : वर कोणी "दुसर्‍या" आयडीने येण्या बाबद बोलला आहे. त्याला शुभेच्छा माझा टारझन हा एकंच आय.डी. होता,(आहे आणि राहिल काय ? होताच ) दुसर्‍या आय.डी.ने यायची इच्छा नाही.
टिप २: भुतकाळात जर आम्ही कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांची मी क्षमा मागतो . आणि प्रांजळपणे नमुद करतो, की त्यात व्यक्तिगत आकस ०% होता.

दोन विनंत्या -

कृपया धागा उडवू नये
कृपया धागा वाचनमात्र ठेवू नये
कधी मधी वेळ मिळाला तर आमचा हक्काचा ब्लॉग आहेच .. तिकडे चक्कर टाकत जा
http://prashantnimbalkar.blogspot.com/

Anonymous said...

की मी केलेली मस्करी ही "आयडी" लिमीटेड आहे, कोणत्या सदस्याला आई-बहिणींवरुन किंवा अश्लिल शिव्या देऊन , किंवा त्याच्या शारिरीक व्यंगावरुन किंवा त्याच्या आर्थिक/मानसिक परिस्थितीवरुन मी कधीच कमेंट्स केल्या नाहित.
--
वा रे टारझन! ज्याला त्याला बा*** भां** असल्या शिव्या देणे. बाकरवडी, गटने वगेरे सदस्यांवर घाणेरडी टीपणी करणे, सदस्त्यांना मारामारीच्या धमक्या देणे. वगैरे गोष्टी मिपावर झाल्याच नाहित नाही?

Anonymous said...

जालगावातलं भूत - भाग २ (अंतिम)

प्रेषक राजेश घासकडवी ( मंगळ, 06/29/2010 - 15:37) .
विनोद
मौजमजा
प्रकटन
विरंगुळा
जालगावातलं भूत - भाग १

"गुरुजी, तुम्ही?” एक ताठ पारंबी हलली. पारंबीवरच्या मल्लखांबातलं एक अनवट आसनसोडवून घेऊन ती व्यक्ती खाली उतरली.
"होय वत्सा मीच. जालिंदर जलालाबादी. सध्या मुक्कामपोस्ट जालगाव.”

मी शब्द ऐकत होतो, गुरुजींना समोर पाहात होतो. पण कानांवर, डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. पण चटकन भान राखून त्यांच्या पायावर लोळण घेतली.
"किती दिवसांनी गुरुजी... र्वांडानंतर आपण प्रथमच भेटतो आहोत.”
"नाही, त्या सभेत गोळीबार झाला, तेव्हा तू होतासच तिथेच.”
"होय. बुरुंडीतले ते दिवस कसे विसरेन? पण त्यावेळी आपली भेट अशी झाली नव्हती. तुमची अंत्ययात्रा काढली त्यात खांदा द्यायला तुमच्या शेजारी मीही होतोच की. आता पुन्हा तुम्हाला बघून इतका आनंद झाला म्हणून सांगू...”
"तो आनंद व्यक्त करण्यासाठीच तू अठरा मिनिटं उशीरा आलास, नाही का? का वाटेत ट्राफिक लागला वाटतं...पुण्यातला?" जालिंदरबाबांनी खवचटपणे विचारलं.
"क्षमा करा गुरुजी. माझी वाट चुकली.”
"हम्म्म्म चालायचंच. सगळ्यांच्याच वाटा चुकताहेत सध्या... पण इतका उशीर क्षम्य नाही.”
"चुकलं गुरुजी.”
"तुझी गणितं खूपच चुकताहेत सध्या. दोन मिनिटं लागायची तिथे तुला वीस मिनिटं लागली. दहा पटीने चुकलास.”
"खरं आहे गुरुजी.”
त्यांनी धुळीत एक पिंकेची चूळ टाकली. "हे आकडेवारीचं कसलं खूळ घेऊन बसला आहेस. असली भलती भूल पडू देऊ नकोस स्वतःवर. गाडी रुळावरून घसरू देऊ नकोस. तुझं कूळ विसरू नकोस. तुझ्या मूळ शक्तीस्थळांवर फोकस कर.. छे मला या ऊळाकारांताचा इतक्यातच कंटाळा आला. वीस वीस कोणी कसं सहन करतं कोण जाणे.”
"समजलो नाही गुरुजी.”
"अरे, गणितं करणं हा तुझा पिंड आहे का?”
"एके काळी होता गुरुजी. एके काळी माझं गणित चांगलं होतं.”
"पण आता नाही. हेच सिद्ध झालं ना? अरे, उंट तिरकाच चालतो, हत्ती सरळच जातो, घोडा अडीच घरं उड्या मारतो. उंटाला जर तू म्हटलंस सरळ जा, तर त्याला जमणारच नाही ते. पिंडच नाही त्याचा तो.”
जालिंदरबाबा कधीकधी गूढ आणि नाटकी बोलतात. कधी कधी नाटकी म्हणजे नाटकातली वाक्यच बोलतात.
"परवा कोणीतरी म्हटल्याप्रमाणे तू आपला पूर्णवेळ काव्यरसग्रहणाचा धंदा कर. माझी शिकवण लक्षात ठेव. त्या कवीतकचं पुढे काय झालं?”