"गुरुजी, तुम्ही?” एक ताठ पारंबी हलली. पारंबीवरच्या मल्लखांबातलं एक अनवट आसनसोडवून घेऊन ती व्यक्ती खाली उतरली.
"होय वत्सा मीच. जालिंदर जलालाबादी. सध्या मुक्कामपोस्ट जालगाव.”
मी शब्द ऐकत होतो, गुरुजींना समोर पाहात होतो. पण कानांवर, डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. पण चटकन भान राखून त्यांच्या पायावर लोळण घेतली.
"किती दिवसांनी गुरुजी... र्वांडानंतर आपण प्रथमच भेटतो आहोत.”
"नाही, त्या सभेत गोळीबार झाला, तेव्हा तू होतासच तिथेच.”
"होय. बुरुंडीतले ते दिवस कसे विसरेन? पण त्यावेळी आपली भेट अशी झाली नव्हती. तुमची अंत्ययात्रा काढली त्यात खांदा द्यायला तुमच्या शेजारी मीही होतोच की. आता पुन्हा तुम्हाला बघून इतका आनंद झाला म्हणून सांगू...”
"तो आनंद व्यक्त करण्यासाठीच तू अठरा मिनिटं उशीरा आलास, नाही का? का वाटेत ट्राफिक लागला वाटतं...पुण्यातला?" जालिंदरबाबांनी खवचटपणे विचारलं.
"क्षमा करा गुरुजी. माझी वाट चुकली.”
"हम्म्म्म चालायचंच. सगळ्यांच्याच वाटा चुकताहेत सध्या... पण इतका उशीर क्षम्य नाही.”
"चुकलं गुरुजी.”
"तुझी गणितं खूपच चुकताहेत सध्या. दोन मिनिटं लागायची तिथे तुला वीस मिनिटं लागली. दहा पटीने चुकलास.”
"खरं आहे गुरुजी.”
त्यांनी धुळीत एक पिंकेची चूळ टाकली. "हे आकडेवारीचं कसलं खूळ घेऊन बसला आहेस. असली भलती भूल पडू देऊ नकोस स्वतःवर. गाडी रुळावरून घसरू देऊ नकोस. तुझं कूळ विसरू नकोस. तुझ्या मूळ शक्तीस्थळांवर फोकस कर.. छे मला या ऊळाकारांताचा इतक्यातच कंटाळा आला. वीस वीस कोणी कसं सहन करतं कोण जाणे.”
"समजलो नाही गुरुजी.”
"अरे, गणितं करणं हा तुझा पिंड आहे का?”
"एके काळी होता गुरुजी. एके काळी माझं गणित चांगलं होतं.”
"पण आता नाही. हेच सिद्ध झालं ना? अरे, उंट तिरकाच चालतो, हत्ती सरळच जातो, घोडा अडीच घरं उड्या मारतो. उंटाला जर तू म्हटलंस सरळ जा, तर त्याला जमणारच नाही ते. पिंडच नाही त्याचा तो.”
जालिंदरबाबा कधीकधी गूढ आणि नाटकी बोलतात. कधी कधी नाटकी म्हणजे नाटकातली वाक्यच बोलतात.
"परवा कोणीतरी म्हटल्याप्रमाणे तू आपला पूर्णवेळ काव्यरसग्रहणाचा धंदा कर. माझी शिकवण लक्षात ठेव. त्या कवीतकचं पुढे काय झालं?”
Sunday, August 1, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
झक मारली आणि अभिनंदन केले
प्रेषक: अवलिया बुध, 04/08/2010 - 14:45
राम राम मंडळी
कालच संपादकांचे अभिनंदन केले आणि आज झक मारली आणि अभिनंदन केले असे म्हणण्याची पाळी आली
अभिनंदन होत आहे म्हणुन संपादकांनी अक्षरशः आपल्या कर्तव्याकडे पाठ फिरवलेली आहे
वैयक्तिक टिका टिपण्णी तर चालुच आहे पण त्याचबरोबर मर्यादा सोडुन प्रतिसाद दिले जात आहेत आणि ते उडत नाहीत.
मला लोकशाही अभिप्रेत आहे. माझे प्रतिसाद कारण नसतांना उडवले म्हणुन मी भांडलो पण आहे.
पण आता अति होत आहे असे मला वाटते. तरी संपादकांनी कृपया ते सर्व धागे वाचनमात्र करावे
आणि बाकी सर्वांनी आता शांततेने घ्यावे.
जे काही झाले असेल त्याचा नीट विचार करुन काय कारवाई करायची असेल ती संपादकांनी करावी.
संपादकांनो, झक मारली आणि अभिनंदन केले असे म्हणायची वेळ आणु नका
सदस्यांनो जरा शांततेने घ्या
चोता दोन मिपाप्रतिष्ठान अध्यक्ष झाला आहे.
अभिनंदन!!!!!!!!!!!
एक आटपाट नगर होते. नगर तसे संपन्न, नगराला लक्ष्मीचा आणि सरस्वतीचा वरदहस्त लाभला होता. खरेतर सरस्वतीने जरा सढळ हातानेच इथे खर्च केला होता. नगरात मोठा मोठे थोर कलाकार, वादक, लेखक, कवी, गायक, नकलाकार निवास करत होते. ह्या हरहुन्नरी लोकांना त्यांच्या राज्याबरोबरच बाहेरच्या राज्यात देखील मोठे नाव होते, सन्मान होता. ह्या अशा नगरात काही नगरकंटक देखील होते पण ते सुग्रास जेवणात मेथीचा खडा यावा इतपतच, आणि खरेतर आरोग्याला गरजेचे.
ह्या नगरात एक विदूषक राहायचा. आपली कामे सांभाळून झाली की मग नगराच्या मुख्य चौकात यावे आणि खेळाला सुरुवात करावी हा त्याचा नेहमीचा उद्योग. कधी नकला कर तर कधी विनोद सांग, कधी कोणाचे विडंबन करून लोकांना हसव अस त्याचा उद्योग, खरेतर छंदच म्हणाना. ह्या बदलात दोन कौतुकाचे बोल आणि पाठीवर एखादी शाबासकीची थाप ह्याशिवाय आधिक कसलीच अपेक्षा विदूषकाने केली नाही. आटपाट नगराचे नाव मोठे व्हावे, त्यात आपला थोडा हातभार लावावा अशीच कायम त्याची इच्छा.
एक दिवशी अचानक चक्रे फिरली आटपाट नगराच्या राजाला पदावरून पायऊतार व्हावे लागले. नवीन राजा सिंहासनावर आरूढ झाला. जुना राजा मोठा दर्दी, हरहुन्नरी. तोंडाचा थोडा फटकळ पण योग्य माणसाची कदर जाणणारा होता. स्वतः एक कलाकार असल्याने साहित्याची, कलेची जाण असणारा होता. नवीन राजा देखील मोठा हरहुन्नरी, कलेची जाण असणारा पण कामात व्यस्त असणारा होता. जुन्या राजाकडे एकाच राज्याची जबाबदारी होती मात्र नवीन राजाकडे अनेक राज्यांच्या जबाबदाऱ्या असल्याने नवीन राज्याला देण्यासाठी त्याच्याकडे पुरेसा वेळ उपलब्ध न्हवता. नवीन राज्याची घडी आपणाला हवी तशी बसवण्यासाठी मोकळा वेळ मिळेपर्यंत जुन्याच राजाच्या मंत्रिमंडळाकडे कारभार सोपवावा असे नवीन राजाने ठरवले. थोडेफार जुजबी बदल करून त्याचे जुन्याच मंत्र्यांकडे राज्याचा कारभार सोपवून टाकला. झाले इथेच एका दुष्टचक्राची सुरुवात झाली....
Post a Comment