मिसळभोक्ता लिहितात..

हे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना "भां*त", आणि "बा*वला तिच्यायला" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे!

धन्य तात्या ! आणि धन्य तो अनाम म्हातारा !


Wednesday, October 15, 2008

बाळीशा भाग २

बाळीशा भाग २

अरे असं काय करतोयंस बाळीशा. नाही मिळाले तुला मराठीच्या पेपरात जास्त गुण म्हणून इतकं का हिरमुसायचं? अरे थोडी तयारी केली की कोणालाही पास होता येतं. इतके दिवस माझ्यासोबत राहूनही तू बाकी फारच हळवा राहिलास बेट्या. थांब मी जरा तुला थोडंस समजावूनच सांगतो. तू काळजीपूर्वक बघितलंस का पेपराकडं? तुला सहसंदर्भ स्पष्टीकरणाचे गुण मिळाले नाहीत म्हणून तुझा एकंदर स्कोअर खाली आला बघ.

काय म्हणतोस? तुला संदर्भासह स्पष्टीकरण जमत नाही? किती रे वेंधळा तू बाळीशा! संदर्भासह स्पष्टीकरण हा तर भलताच सोपा प्रश्न. उदाहरण देऊ म्हणतोस? तू बाकी खरा वेंधळा आहेस की वेंधळ्याचे सोंग घेऊन वावरत आहेस हेच समजत नाही बाळीशा.

ठीक आहे. आपण ग्रेस यांची 'तुला पाहिले मी' ही कविता घेऊ.

तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळे

मी तुला नदीच्या किनारी पाहिले तेव्हा तुझे केस पाठीवर मोकळे होते. इथे नदीचे नाव दिलेले नाही त्यामुळे ग्रेस यांच्या कवितेचा संदिग्धपणा अधोरेखित झाला आहे. शिवाय 'केस मोकळे' म्हणण्याऐवजी 'केस पाठीवरी मोकळे' असे म्हटले आहे. कवितेच्या हिरॉईनचे केस हे लांबसडक आहेत. लांबसडक केसांची मजा काही औरच. अगदी 'सुंदर लंबे काले बाल, घने घने मतवाले बाल, डाबर आंवला केश तेल' या अतिमधुर गाण्याची आठवण येते. काय कोमल ऋषभ आणि गंधार लावला आहे त्यात. असो. त्या गाण्यातील सौंदर्यस्थळे पुन्हा कधीतरी...

तुझी पावले गे धुक्याच्या महाली
ना वाजली ना कधी नादली
निळा गर्द भासे नदीचा किनारा
न माझी मला अन तुला सावली

ओहोहो... तुझी पावले धुक्याच्या महाली कधी वाजली नाहीत वा नादली नाहीत.

नदीचा किनारा निळा गर्द भासतो आणि माझी मला आणि तुझी तुला सावलीही नाही.

धुक्याचा महाल असे म्हटल्याने कवितेचा धूसरपणा अधोरेखित होतो.संगीत हा ह्या परमसृष्टीचा जीव की प्राण आणि संगीताची मजा आवाजावर अवलंबून असते. मात्र पावलांचा आवाजही न आल्याने कवितेला एक गूढत्त्व प्राप्त झाले आहे असे वाटते. नदीचा निळा गर्द किनारा या उपमेतून ग्रेस यांच्या स्वप्नील प्रतिभेचा प्रत्यय येतो.

आजकाल प्रदूषणामुळे सर्व नद्यांची वाट लागली असली तरी ग्रेस यांना नदीचा गर्द निळा किनारा दिसत आहे. झाडे तोडून लोकांनी पर्यावरणाचीही वाट लावल्याने एकमेकांच्या सावल्या घ्याव्यात म्हणावे तर त्या सावल्याही नाहीत. ग्रेस यांनी बहुधा दुपारी बारा वाजता ही कविता लिहिली असावी. सूर्य डोक्यावर असल्याने यावेळी सावली पडत नाही.

आता आपण थेट शेवटच्या ओळीकडे जाऊत.

तमातून ही मंद ता-याप्रमाणे
दिसे की तुझ्या बिलवरांचा चुडा

क्या बात है.. ! 'तमातून ही मंद ता-याप्रमाणे दिसे की तुझ्या बिलवरांचा चुडा" अशी ओळ. बिलवरांचा चुडा तमातूनही मंदतार्‍याप्रमाणे दिसतो... क्या बात है..! किंबहुना लोडशेडिंगच्या या दिवसांमध्ये आय मीन रात्रीमध्ये लोकांच्या डोळ्यांपुढे तारे चमकले असले तरी ग्रेस यांच्या डोळ्यांपुढे बिलवरांचा चुडा आहे.

असो, एक हृदयाला हात घालणारं गाणं! एखाद्या सर्जनशील, संवेदनशील चित्रकराला हे गाणं नुसत ऐकून हातात कुंचला घ्यावासा वाटेल आणि त्याच्या कॅन्व्हासवर डौलाने जाणारी ती छानशी पाठीवर मोकळे केस घेऊन जाणारी तरूणी उतरेल.. त्या चित्रात पार्श्वरंग असतील पर्यावरणाचा नाश, नदीचे वाटोळे आणि लोडशेडिंगच्या संकटाचे !!!

बघितलंस बाळीशा झाले संदर्भासह स्पष्टीकरण लिहून.

काय म्हणतोस? अगदी नि:शब्द झालास हे वाचून!!

अरे किती रे चांगला तू बाळीशा. मी अगदी कॄतज्ञ आहे बघ.


तू म्हणून मी ही युक्ती इथे सांगितली. मराठीचा पेपर जाऊदेबस. पुढे मागे मराठी संकेतस्थळांवर गुणग्राहक व्यक्तिमत्त्व म्हणून वावरशील बेट्या. अरे अशी रसग्रहणे पाडायची म्हणजे फक्त बैठक पक्की असावी लागते. एकदा बूड जमवले बसल्या बैठकीत दोनचार लेखही सहज पाडशील, म्हणताम्हणता लोकप्रिय होशील.

लोक प्रतिसाद देणार नाहीत? काळजी नको! लोक प्रतिसाद देतातच. पानवाला जसा पानावर चुन्याचे बोट लावून ठेवतो तसे लेखात ठिकठिकाणी कोमल, द्रुत, गंधार, ऋषभ अशी बोटे पुसून ठेवायची. मंडळी सगळ्यात जास्त कशाला घाबरत असतात तर आपले अज्ञान उघडे पडेल याला. अशी रंगीत बोटे बघितली की आपोआप प्रतिसाद टपाटपा पडतील.तरीही प्रतिसाद मिळाले नाही तर? फारच शंकेखोर बुवा तू. सपकसुप्रियेला भेटला होतास काय? हा हा.

अरे एकदोन वेगळ्या नावाचे आयडी हाताशी ठेवायचे. शक्यतो स्त्रियांची नावे घ्यायची आणि त्या आयडीमधून "वा बाळीशा काय हो तुमचं लिखाण हापूस आंब्यासारखं यम्मी" असले प्रतिसाद द्यायचे.

उदा. मीनल हाच आयडी घे. हां आता तुला तो आयडी घेता येणार नाही. सरपंचांनी आधीचे घेऊन ठेवलाय तो!

मीनल, प्राजक्ती, पल्लवी असे आयडी वापरून, "मला या लेखात पूर्वीसारखी मजा आली नाही" असे म्हणायचे. आणि मग खाली "शक्य आहे. या गाण्यात मी केवळ पर्यावरणविषयक सौंदर्यस्थळे उलगडवून दाखवली होती" असे स्पष्टीकरण द्यायचे.

काय म्हणतोस? खोटारडेपणा? कित्ती रे भोळा तू बाळीशा. जरा चारचौघात उठबस करायला शिक. तुझ्या पुस्तकी ज्ञानाचा इथे उपयोग नाही. थोडे व्यावहारिक ज्ञानही हवे. काय समजलास?

10 comments:

Anonymous said...

Evhadhe hasalo ki dolyat pani aale hasun hasun. Vatale aata khurchitun padato ki kaay hya hasanyane bebhan houn.

Agadi h.h.to.ja.khu.p.

Hasun Hasun Tol Jaun Khurchitun Padalo.

Aata haatwali khurchi ghyayala havi.

Anonymous said...

इतके दिवस माझ्यासोबत राहूनही तू बाकी फारच हळवा राहिलास बेट्या.

भाऊसाहेब, काही जण जन्मजात निगरगट्ट असतात, काही परिस्थितीने निर्ढावतात. पण बंडुतात्यांचा निलाजरेपणा मात्र खासच. तो रक्तातच असायला हवा.

Anonymous said...

आवर्जून प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचकवरांना मनापासून धन्यवाद. आपल्या सर्वांचा मी ऋणी आहे...

ज्यांना इच्छा असूनही हे लेखन वाचायला टाईम भेटला नाही आणि ज्यांना हे लेखन बरावाईट असा कुठलाच प्रतिसाद देण्याच्या लायकीचे वाटले नाही त्या सर्वांचेही आभार..

माधवीतात्या.

Anonymous said...

haa haa haa..hi pratisadachi style lai aavadali baraka madhavi 'dada'

Anonymous said...

ज ह ब ह ऱ्या.

Anonymous said...

पण बंडुतात्यांचा निलाजरेपणा मात्र खासच.

बाकी काय बोललात. लय भारी !

अहो, आमच्या तात्यांवर गाणे पण आहे. निलाजरे पण कटिस बांधले, निसुगपणाचा शेला, आत्मस्तुतीचे कुण्डल कानी, गर्व जडवला भाला.

Anonymous said...

हा हा हा... माधवी रुपातील साडी नेसलेला तात्या अंमळ ओंगळवाणा दिसेल. :))

Anonymous said...

हा हा हा... +१



-माधवी

Anonymous said...

आपण आमच्या बंडूतात्यांविषयी पाने भरभरून लिहिता, माझ्या विषयी मात्र १-२ वाक्य. आम्ही नाही जा बोलणार तुमच्याशी. कट्टी, कट्टी, कट्टी. बारा वर्षे बोलू नका (बोलण्याचे काम फक्त मीच करणार). बघा, मी विकीवरून किती छान छान उतारे इकडे तिकडे छापते. मग त्यावर मनाला येईल ते निष्कर्ष काढते आणि इतिहासाने हे कधीच सिद्ध केले आहे असा कांगावा करते. 'खोटे बोल पण ठासून बोल' हेच माझे ब्रीदवाक्य आहे. तुम्हाला तरी जमेल का असे? लायकी नाही तर लिहावे कशाला? तुमच्या जागी दुसरा कोणी असता तर माझ्या स्तुतीपोटी हजार-एक पाने तरी लिहिली असती त्याने आत्तापर्यंत.

Anonymous said...

माधवी रुपातील साडी नेसलेला तात्या अंमळ ओंगळवाणा दिसेल. :))


धत् तेरे की. दिवाळी म्हणून मी शर्ट-प्यांट घातली आहे.