मिसळभोक्ता लिहितात..

हे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना "भां*त", आणि "बा*वला तिच्यायला" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे!

धन्य तात्या ! आणि धन्य तो अनाम म्हातारा !


Friday, February 6, 2009

कम्युनिष्ठ मिपा

Aatach misalpav.com var vachalela ha dhamal pratisaad.

नीलकांतराव

प्रेषक चोरीराम कोतवाल ( बुध, 02/04/2009 - 15:27) .

मी असंही ऐकलं आहे की कम्युनिझम हा असा विचार आहे की ज्यांना तो मान्य नसेल त्यांना संपवण्याचा एकमेव मार्ग कॉमरेडांना माहीती आहे. शोध घेता जगातील समुहहत्या करणार्‍यांत कम्युनिष्ठांचं नाव येणं हे सुध्दा सहज आहे ना? ऍटॉक्रसी किंवा हुकूमशहा बाबत तुमचं काही विशेष तत्वज्ञान आहे का?

लोकशाहीचा तुम्हाला आलेला कळवळा समजू शकतो पण इथे गेले १ वर्षभर आणीबाणी आहे आणि नुकताच एका सदस्याचा ह्या संकेतस्थळावर अकाली मृत्यु झाला / इथल्या खरोखरच्या कम्युनिष्ठांनी त्याला संपवला हा समुह हत्येचाच एक भाग मानायचा का? त्या विषयी तुम्ही का गुळणी धरलेली आहे? का त्याचेही काही विशेष तत्वज्ञान आहे? का लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वत: कोरडे पाषाण?
---
हा मारला गेलेला सदस्य विश्वकर्मा नीलकांत ह्यांचा मित्र आहे म्हणे आणि तरीही त्यांनी ह्या हत्येविषयी गुळणी धरली आहे!

वाह रे मित्रप्रेम.. काय तुमची कम्युनिष्ठा!! हा हा हा

9 comments:

Anonymous said...

नीलकांतच कशाला त्या कोलबेरानं टाकलेल्या धाग्यावर एकही प्रतिसाद न देणारे सगळेच एकजात चाटू आणि गांडू आहेत. त्या धाग्यामुळे कळले तरी खरा दम किती जणांच्यात आहे ते.

Anonymous said...

अहो हे सगळे सोडा!

मुक्ताबाई आणि सहजने सुरू केलेला मचमचपुरी ब्लॉग बघीतलात का?

आत्ताच भाकित वर्तवतो..तुम्हाला कॉंपीटीशन आहे हो मिसळप्रेमी..

आपला,
(पोपट ज्योतिषी) रॉकिपंत दगडे

Anonymous said...

http://misalpav.com/node/6164 वरनं उडालेला जहबहराट प्रतिसाद. मानलं बुव्वा ह्या चोरीरामाच्या प्रतिभेला. मस्त ठोकलं मिपावाल्यांना.
___________________________________

तसं पाह्यला गेलं तर
नवीन
प्रेषक चोरीराम कोतवाल ( शनी, 02/21/2009 -07:52) .

खरतर असा कायदा करावा लागणे किंवा त्याचा आधार घेणे हे समाज म्हणुन आणि व्यक्ती म्हणुनही आपले अपयश आहे.

मनोगत आणि उपक्रम ह्यांनी मिसळपावला जन्माला घातले. मिसळपाव त्यांचेच बाळ म्हणावे लागेल. त्या दोघांचा इथे येताजाता उद्धार होतोच आहे. त्यावरुन काय ते लक्षात घ्यावे. हल्ली ग्रॅटिट्युड कि काय म्हणतात तो उरलाच नाहीये.

Anonymous said...

त्या गटण्याला सगळ्यांनी खोपच्यात घेऊन चेपले आहे. एका सदस्याचा आयपी पब्लिकली जाहीर केल्यावर त्याची चवीष्ट चर्चा करणारे सरपंच महाराज दुस-यांनी आयपी ट्रॅक करु नयेत याची सूचना करताना पाहून अंमळ गंमत वाटली. यानिमित्ताने बरीच सोंगे उघडी झाली हेही नसे थोडके

Anonymous said...

कमालच आहे! तो राज जैन उघड उघड सांगत आहे त्याने अनेक सदस्यांचे आयपी ट्रॅक केले म्हणून. आणि सरपंचांचे त्यावर मात्र मौन? मिपावर सदस्यांच्या सुरक्षीतसेसाठी जागरुक असण्याचे ढोंग करणारे सरपंच आता कुठे गेले?

गटण्याला एकट्यालाच कोपचीत घ्यायचा प्रकार मात्र कंपूबाजीची हद्द आहे.आणि हे कंपूबाज उद्या सरपंचालाही विकून खाणार आहेत तेव्हा बसेल सरपंच अनुष्काचे फोटो डाऊनलोड करत.. खी खी खी

Anonymous said...

ज्या सदस्याचा आयपी सरपंचांनी उघड करु दिला होता ते माझे मानेलेले काका आहेत. त्यांना आणि मला ह्यातून खूप मनस्ताप झाला आहे/होता.

मी अजूनही मिपावर येतो ते फक्त मोडकळीला आलेले मिपा बघून करमणूक करुन घ्यायला. मिपा संपादकीय वगैरे बंद करुन शिवराळ आर्वाच्य भाषेत चाललेल्या चर्चा आणि त्याने मिपाची झालेली झोपडपट्टी बघून मला अतीव आनंद होतो.

Anonymous said...

मिपावरुन उडालेला आणखी एक लेख. तशी शिळीच कढी आहे. पण तुम्ही उडवलेले लेखन छापता म्हणून देत आहे

-चाटूरंग
---

राम राम मंडळी,

आमचे परममित्र श्री बेसनलाडू यांनी मला एक पोष्टकार्ड पाठवले आहे. मंडळी, मला सांगायला अतिशय आनंद होतो की या पोष्टकार्डातून लाडूसाहेबांची आमच्याबद्दल आणि मिसळपावबद्दल केवळ अन केवळ आत्मियताच दिसते! आणि तेवढी आत्मियता असल्याशिवाय उगाचच्या उगाच, वेळ काढून कुणी पानभर पत्र लिहीत नाही याची मला कल्पना आहे!

लाडूसाहेबांच्या पत्राला मी व्य नि नेच (पोष्टकार्डामार्फत) उत्तर पाठवणार होतो परंतु लाडूसाहेबांचे पत्र आणि मी त्याला दिलेले उत्तर इथे जाहीरपणे देत आहे. मला पूर्ण कल्पना आहे की आमच्यातला व्यक्तिगत पत्रव्यवहार मी लाडूसाहेबांच्या पूर्वपरवानगीशिवाय येथे चव्हाट्यावर आणत आहे आणि त्याकरता मी लाडूसाहेबांची जाहीर माफी मागतो, तसेच त्यांचा राग सहन करण्याचीही माझी तयारी आहे!

परंतु सदर पत्र हे मिसळपावच्या हिताशी संबंधित आहे, त्यात इतर कुठलाच व्यक्तिगत संदर्भ नाही म्हणूनच मी ते येथे जाहीरपणे देत आहे, एवढेच सांगू इच्छितो!

धन्यवाद,

आपलाच,
तात्या अभ्यंकर.

सुरवातीला लाडूसाहेबांचे संपूर्ण पत्र लाल अक्षरात -

नमस्कार तात्या,
गेल्या दोन वर्षांपेक्षा थोडा जास्त काळ मराठी संकेतस्थळांवरील एक परिचित व्यक्तिमत्त्व म्हणून माझ्याच्याने ओळखल्या जाणार्‍या तात्या अभ्यंकरांचा मनस्वी शुभचिंतक म्हणून हा निरोप तुमच्यासाठी. मी शिवराळच आहे, मी फाटक्या तोंडाचाच आहे, मी नंगा फकीरच आहे, अशा सबबींखाली सार्वजनिक सभ्यता आणि शिष्टाचार 'रिप्लेस' करता येत नाही, असे मला वाटते. आणि सार्वजनिक शरमेचे वावडेच असेल, तर कोकणी आणि देशी शिव्या, आयमाय असलेल्या आणि नसलेल्या शिव्या असे डिस्टिंक्शन तरी कशाला? प्रतिसाद उडवताना तरी या डिस्टिंक्शनचा विचार कशाला? एक तर सरसकट असे आक्षेपार्ह वाटणारे सगळेच प्रतिसाद उडवा, किंवा सगळेच ठेवा. पंचायत समितीच्या डोक्यावर सगळ्या जबाबदार्‍या मारून मोकळे झालो, म्हणजे मालक म्हणून तुमची येथील जबाबदारी संपली आणि वाटेल त्याला मनमुराद शिव्या घालायचे लायसन्स तुम्हाला मिळाले, असे निदान मला तरी वाटत नाही. १००% सोवळ्यातले तर आम्हीही नाही हो; पण शंभर लोकांमध्ये कोणत्याही प्रकारची शिवी देताना आपण कोठे आहोत, प्रसंग-परिस्थिती काय आहे, आजूबाजूला कोण आहे, याचे भान सुटून चालेल का? उद्या चार मित्रांच्या टोळक्यात मौजमस्ती करताना किंवा भांडणे करताना मी सुद्धा हजार शिव्या देईन, नव्हे दिल्याही आहेत. पण एखाद्या घरगुती समारंभात अशा मित्रांच्या जोडीलाच नातेवाईक असतानाही मी तशाच स्वरूपातील टिंगलटवाळीत किंवा खटके उडाल्यास होणार्‍या वादावादीत सामील होताना अशाच प्रकारच्या शिव्या देईन का, याचा विचार आपण करावा, असे मला वाटते. अशाच प्रकारच्या (नॉट एग्जॅक्टली दिस) एका मुद्द्याबाबत मागे एकदा प्रियालीतईनेही तुम्हाला उपक्रमावर टोकल्याचे माझ्या चांगलेच लक्षात आहे. पण त्यानंतरही आज मला तुम्हाला (काही वेगळ्या बाबतींत तरी का होईना) टोकावे लागते आहे, याचे वाईट वाटते आहे. असे कटू प्रसंग वारंवार तुमच्याच बाबतीत अनुभवायला मिळत असतील, तर ते टाळण्यासाठी प्रयत्न कुणी करायला हवेत? मिसळपाव हे मराठीतून लिहिण्यावाचण्यासाठी आणि विचार व्यक्त करण्यासाठी उपलब्ध करून दिलेले संकेतस्थळ असेल, तर कोणत्याही प्रकारच्या साहित्याला प्रतिसाद देताना मनोगत, तेथील प्रशासक आणि आधी तुमच्य मर्जीतली असणारी पण आता काही कारणांमुळे तुमच्या मर्जीतून उतरलेली मंडळी यांना मनसोक्त शिव्या घालण्याचे माध्यम म्हणून त्याचा उपयोग का होतो आहे / केला जात आहे? की मिसळपावच्या निर्मितीमागचे उद्दिष्टच अशा ओकार्‍या करण्यासाठीचे बेसिन उपलब्ध करून देण्याचे आहे? नक्कीच नसावे / नाही. पण मिसळपावावर येणार्‍या रँडम पाहुण्याचा मात्र नक्कीच तसा समज होणार, असे मला खात्रीपूर्वक वाटते. त्यातून "हे असे होत आहे, होणार आहे; यायचे तर या नाहीतर गेलात बाझवत", अशी मग्रूरीची भाषा.
या अनुषंगाने अत्यानंदकाकांचा तुमच्या खरडवहीतील पुढील प्रतिसाद पाहण्यात आला आणि म्हटले मलाही असेच वाटते आहे, ते तुमच्या कानावर घालावे -
जाता जाता तुला एक प्रेमळ सल्ला! उठसुठ अशा शिव्या देत जाऊ नकोस. त्यामुळे तुझ्याबद्दल लोकांमध्ये असलेले गैरसमज उगीचच वाढतात आणि तुझ्या सद्गुणांकडे दूर्लक्ष होते.. रोखठोक बोल पण भाषा मात्र अशी शिवराळ नको. मित्रांच्या अड्ड्यात अशी भाषा चालून जाते ; पण सार्वजनिक स्थळी तरी तुझ्यासारख्या एका संस्थ च्या मालकाने असे बोलणे केव्हाही योग्य नव्हे .
कदाचित मी वयाच्या, अनुभवाच्या आणि अधिकाराच्या मानाने फारच जास्त, नको ते बोलत असेन; पण तुमचा हितचिंतक म्हणून बोलतो आहे, हे कृपया लक्षात घ्या. मला जे म्हणायचे आहे, ते तुम्हाला कळले असेल, अशी आशा करतो.
सस्नेह,
बेसनलाडू.

आता लाडूसाहेबांच्या पत्रातील मुद्द्यांना माझे उत्तर निळ्या अक्षरात -

प्रतिसाद उडवताना तरी या डिस्टिंक्शनचा विचार कशाला? एक तर सरसकट असे आक्षेपार्ह वाटणारे सगळेच प्रतिसाद उडवा, किंवा सगळेच ठेवा.

First of all, to be very frank with you, मी एकही प्रतिसाद उडवत नाही, किंवा संपादितही करत नाही.

पंचायत समितीच्या डोक्यावर सगळ्या जबाबदार्‍या मारून मोकळे झालो, म्हणजे मालक म्हणून तुमची येथील जबाबदारी संपली आणि वाटेल त्याला मनमुराद शिव्या घालायचे लायसन्स तुम्हाला मिळाले, असे निदान मला तरी वाटत नाही.

तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, परंतु पंचायत समितीने माझे शिव्यांचे प्रतिसाद अगदी बिनदिक्कत संपादित करावे किंवा काढूनही टाकावे, माझं काहीच म्हणणं नाही. कुणा एका माणसाच्या मर्जीवर एखादे संकेतस्थळावरील लेखन, प्रतिसाद, संपादन अवलंबून असावे याच्या मी पहिल्यापासूनच विरोधात होतो, लोकशाहीचा कट्टर समर्थक होतो/आहे. आणि म्हणूनच जी माणसं माझ्या ताटाखालचे मांजर होणार नाहीत, मालक म्हणून माझी जराही भीडभाड बाळगणार नाहीत, किंवा मी त्यांना पंचायत समितीचे सदस्य नेमले आहे म्हणून माझे मिंधेही होणार नाहीत, अशीच माणसं मी पंचायत समितीवर नेमली आहेत. आता ही मंडळी माझे शिव्यांचे प्रतिसाद काढून टाकत नाहीत किंवा संपादित करत नाहेत याला माझा काय इलाज सांग बरं!

पंचायत समितीपैकी तू कुणालाही विचार, मी अगदी सुरवातीपासूनच त्यांना माझ्या बरोबरीचे मानत आलो आहे, त्यांना त्यांच्या कार्यपद्धतीकरता संपूर्ण मुभा दिली आहे, तसेच मी मालक आहे तेव्हा मला काही विशेष सवलती हव्यात असा उच्चारही कधी केलेला नाही. आता यापेक्षा अधिक मी काय करायला हवं सांग बघू. लेखन-प्रतिसादाच्या बाबतीत पूर्ण अभिव्यक्ति स्वातंत्र्य असावं, आंतरजालावरील मराठी भाषेच्या प्रसाराकरता आणि प्रचाराकरता माझाही खारीचा हातभार लागावा, या हेतूने मी हे संकेतस्थळ काढलं, बोलल्याप्रमाणे इथे अभिव्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही रुजवायचा प्रयत्न केला, आणि माझे जराही मिंधे नसलेल्या व्यक्तिंना संपादनाचे सर्व अधिकार दिले, यात माझं काही चुकलं का ते सांग बरं!
१००% सोवळ्यातले तर आम्हीही नाही हो; पण शंभर लोकांमध्ये कोणत्याही प्रकारची शिवी देताना आपण कोठे आहोत, प्रसंग-परिस्थिती काय आहे, आजूबाजूला कोण आहे, याचे भान सुटून चालेल का? उद्या चार मित्रांच्या टोळक्यात मौजमस्ती करताना किंवा भांडणे करताना मी सुद्धा हजार शिव्या देईन, नव्हे दिल्याही आहेत. पण एखाद्या घरगुती समारंभात अशा मित्रांच्या जोडीलाच नातेवाईक असतानाही मी तशाच स्वरूपातील टिंगलटवाळीत किंवा खटके उडाल्यास होणार्‍या वादावादीत सामील होताना अशाच प्रकारच्या शिव्या देईन का, याचा विचार आपण करावा, असे मला वाटते.

The point is very well noted Sir! However, I do not promise anything, but will try my level best! )

अशाच प्रकारच्या (नॉट एग्जॅक्टली दिस) एका मुद्द्याबाबत मागे एकदा प्रियालीतईनेही तुम्हाला उपक्रमावर टोकल्याचे माझ्या चांगलेच लक्षात आहे. पण त्यानंतरही आज मला तुम्हाला (काही वेगळ्या बाबतींत तरी का होईना) टोकावे लागते आहे, याचे वाईट वाटते आहे.

वाईट वाटून घेण्याचं काहीच कारण नाही. उलटपक्षी माझ्याबद्दल किंवा मिसळपावबदल प्रामाणिक आत्मियता असल्याशिवाय एखादा माणूस वेळ काढून पानभर पत्र लिहीत नाही/लिहिणार नाही! In fact, I am obliged!

>>असे कटू प्रसंग वारंवार तुमच्याच बाबतीत अनुभवायला मिळत असतील, तर ते टाळण्यासाठी प्रयत्न कुणी करायला हवेत?

पंचायत समितीने! )

मिसळपाव हे मराठीतून लिहिण्यावाचण्यासाठी आणि विचार व्यक्त करण्यासाठी उपलब्ध करून दिलेले संकेतस्थळ असेल, तर कोणत्याही प्रकारच्या साहित्याला प्रतिसाद देताना मनोगत, तेथील प्रशासक आणि आधी तुमच्य मर्जीतली असणारी पण आता काही कारणांमुळे तुमच्या मर्जीतून उतरलेली मंडळी यांना मनसोक्त शिव्या घालण्याचे माध्यम म्हणून त्याचा उपयोग का होतो आहे / केला जात आहे?

चुकलं माझं! मी वेलणकरशेठची आणि सर्व संबंधितांची जाहीर क्षमा मागतो! आज मराठी संकेतस्थळांवर मी कोण आहे हे मला माहीत नाही, परंतु जो काही आहे तो वेलणकरशेठमुळेच आहे!

की मिसळपावच्या निर्मितीमागचे उद्दिष्टच अशा ओकार्‍या करण्यासाठीचे बेसिन उपलब्ध करून देण्याचे आहे? नक्कीच नसावे / नाही. पण मिसळपावावर येणार्‍या रँडम पाहुण्याचा मात्र नक्कीच तसा समज होणार, असे मला खात्रीपूर्वक वाटते.

खरं आहे तुझं! सालं सांभाळलं पाहिजे यापुढे!
Sorry Boss...!

त्यातून "हे असे होत आहे, होणार आहे; यायचे तर या नाहीतर गेलात बाझवत", अशी मग्रूरीची भाषा.

यापुढे काळजी घेईन...

तात्या.

Anonymous said...

हेचि फळ काय मम: तपाला?
नवीन
प्रेषक चोरीराम कोतवाल ( गुरू, 03/05/2009 - 12:23) .
ज्या सर्किटाने पोस्टमन काकांना मिपावर उघडे पाडले त्याचीच इथनं गच्च्छंती. अरेरे, काय हे नशिबाचे भोग. हीच का स्वामिनिष्टेची किमंत.

सहज एक शंका मनात आलीय, 'पोस्टमन' आणि 'पोस्ट मन' हे दोन्ही सदस्य एकच काय?

Anonymous said...

आताच हाती लागलेल्या धक्कादायक बातमीनुसार चोरीराम कोतवाल यांचा आयडी आणि विनायकरावांचा मूळ लेख (संत तात्याबा सुवचने - १) ज्यावर चोरीरामांनी वरील प्रतिक्रिया टाकली होती, ते दोन्ही मिपावरून उडवण्यात आले आहेत.