मिसळभोक्ता लिहितात..

हे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना "भां*त", आणि "बा*वला तिच्यायला" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे!

धन्य तात्या ! आणि धन्य तो अनाम म्हातारा !


Thursday, March 5, 2009

कोण होतास तू काय झालास तू :)

तात्या काय चीझ आहे हे कळावे म्हणून चाटूरंग ह्यांनी आम्हाला हा मिपावरील एक उडवलेला जुना लेख पाठवला आहे. इथे तात्याचे रुप पहा आणि आज त्याची काय अवस्था झाली आहे पाहा.
-मिसळप्रेमी
-----------------------

मिपावरुन उडालेला आणखी एक लेख. तशी शिळीच कढी आहे. पण तुम्ही उडवलेले लेखन छापता म्हणून देत आहे

-चाटूरंग
---

राम राम मंडळी,

आमचे परममित्र श्री बेसनलाडू यांनी मला एक पोष्टकार्ड पाठवले आहे. मंडळी, मला सांगायला अतिशय आनंद होतो की या पोष्टकार्डातून लाडूसाहेबांची आमच्याबद्दल आणि मिसळपावबद्दल केवळ अन केवळ आत्मियताच दिसते! आणि तेवढी आत्मियता असल्याशिवाय उगाचच्या उगाच, वेळ काढून कुणी पानभर पत्र लिहीत नाही याची मला कल्पना आहे!

लाडूसाहेबांच्या पत्राला मी व्य नि नेच (पोष्टकार्डामार्फत) उत्तर पाठवणार होतो परंतु लाडूसाहेबांचे पत्र आणि मी त्याला दिलेले उत्तर इथे जाहीरपणे देत आहे. मला पूर्ण कल्पना आहे की आमच्यातला व्यक्तिगत पत्रव्यवहार मी लाडूसाहेबांच्या पूर्वपरवानगीशिवाय येथे चव्हाट्यावर आणत आहे आणि त्याकरता मी लाडूसाहेबांची जाहीर माफी मागतो, तसेच त्यांचा राग सहन करण्याचीही माझी तयारी आहे!

परंतु सदर पत्र हे मिसळपावच्या हिताशी संबंधित आहे, त्यात इतर कुठलाच व्यक्तिगत संदर्भ नाही म्हणूनच मी ते येथे जाहीरपणे देत आहे, एवढेच सांगू इच्छितो!

धन्यवाद,

आपलाच,
तात्या अभ्यंकर.

सुरवातीला लाडूसाहेबांचे संपूर्ण पत्र लाल अक्षरात -

नमस्कार तात्या,
गेल्या दोन वर्षांपेक्षा थोडा जास्त काळ मराठी संकेतस्थळांवरील एक परिचित व्यक्तिमत्त्व म्हणून माझ्याच्याने ओळखल्या जाणार्या तात्या अभ्यंकरांचा मनस्वी शुभचिंतक म्हणून हा निरोप तुमच्यासाठी. मी शिवराळच आहे, मी फाटक्या तोंडाचाच आहे, मी नंगा फकीरच आहे, अशा सबबींखाली सार्वजनिक सभ्यता आणि शिष्टाचार 'रिप्लेस' करता येत नाही, असे मला वाटते. आणि सार्वजनिक शरमेचे वावडेच असेल, तर कोकणी आणि देशी शिव्या, आयमाय असलेल्या आणि नसलेल्या शिव्या असे डिस्टिंक्शन तरी कशाला? प्रतिसाद उडवताना तरी या डिस्टिंक्शनचा विचार कशाला? एक तर सरसकट असे आक्षेपार्ह वाटणारे सगळेच प्रतिसाद उडवा, किंवा सगळेच ठेवा. पंचायत समितीच्या डोक्यावर सगळ्या जबाबदार्या मारून मोकळे झालो, म्हणजे मालक म्हणून तुमची येथील जबाबदारी संपली आणि वाटेल त्याला मनमुराद शिव्या घालायचे लायसन्स तुम्हाला मिळाले, असे निदान मला तरी वाटत नाही. १००% सोवळ्यातले तर आम्हीही नाही हो; पण शंभर लोकांमध्ये कोणत्याही प्रकारची शिवी देताना आपण कोठे आहोत, प्रसंग-परिस्थिती काय आहे, आजूबाजूला कोण आहे, याचे भान सुटून चालेल का? उद्या चार मित्रांच्या टोळक्यात मौजमस्ती करताना किंवा भांडणे करताना मी सुद्धा हजार शिव्या देईन, नव्हे दिल्याही आहेत. पण एखाद्या घरगुती समारंभात अशा मित्रांच्या जोडीलाच नातेवाईक असतानाही मी तशाच स्वरूपातील टिंगलटवाळीत किंवा खटके उडाल्यास होणार्या वादावादीत सामील होताना अशाच प्रकारच्या शिव्या देईन का, याचा विचार आपण करावा, असे मला वाटते. अशाच प्रकारच्या (नॉट एग्जॅक्टली दिस) एका मुद्द्याबाबत मागे एकदा प्रियालीतईनेही तुम्हाला उपक्रमावर टोकल्याचे माझ्या चांगलेच लक्षात आहे. पण त्यानंतरही आज मला तुम्हाला (काही वेगळ्या बाबतींत तरी का होईना) टोकावे लागते आहे, याचे वाईट वाटते आहे. असे कटू प्रसंग वारंवार तुमच्याच बाबतीत अनुभवायला मिळत असतील, तर ते टाळण्यासाठी प्रयत्न कुणी करायला हवेत? मिसळपाव हे मराठीतून लिहिण्यावाचण्यासाठी आणि विचार व्यक्त करण्यासाठी उपलब्ध करून दिलेले संकेतस्थळ असेल, तर कोणत्याही प्रकारच्या साहित्याला प्रतिसाद देताना मनोगत, तेथील प्रशासक आणि आधी तुमच्य मर्जीतली असणारी पण आता काही कारणांमुळे तुमच्या मर्जीतून उतरलेली मंडळी यांना मनसोक्त शिव्या घालण्याचे माध्यम म्हणून त्याचा उपयोग का होतो आहे / केला जात आहे? की मिसळपावच्या निर्मितीमागचे उद्दिष्टच अशा ओकार्या करण्यासाठीचे बेसिन उपलब्ध करून देण्याचे आहे? नक्कीच नसावे / नाही. पण मिसळपावावर येणार्या रँडम पाहुण्याचा मात्र नक्कीच तसा समज होणार, असे मला खात्रीपूर्वक वाटते. त्यातून "हे असे होत आहे, होणार आहे; यायचे तर या नाहीतर गेलात बाझवत", अशी मग्रूरीची भाषा.
या अनुषंगाने अत्यानंदकाकांचा तुमच्या खरडवहीतील पुढील प्रतिसाद पाहण्यात आला आणि म्हटले मलाही असेच वाटते आहे, ते तुमच्या कानावर घालावे -
जाता जाता तुला एक प्रेमळ सल्ला! उठसुठ अशा शिव्या देत जाऊ नकोस. त्यामुळे तुझ्याबद्दल लोकांमध्ये असलेले गैरसमज उगीचच वाढतात आणि तुझ्या सद्गुणांकडे दूर्लक्ष होते.. रोखठोक बोल पण भाषा मात्र अशी शिवराळ नको. मित्रांच्या अड्ड्यात अशी भाषा चालून जाते ; पण सार्वजनिक स्थळी तरी तुझ्यासारख्या एका संस्थ च्या मालकाने असे बोलणे केव्हाही योग्य नव्हे .
कदाचित मी वयाच्या, अनुभवाच्या आणि अधिकाराच्या मानाने फारच जास्त, नको ते बोलत असेन; पण तुमचा हितचिंतक म्हणून बोलतो आहे, हे कृपया लक्षात घ्या. मला जे म्हणायचे आहे, ते तुम्हाला कळले असेल, अशी आशा करतो.
सस्नेह,
बेसनलाडू.

आता लाडूसाहेबांच्या पत्रातील मुद्द्यांना माझे उत्तर निळ्या अक्षरात -

प्रतिसाद उडवताना तरी या डिस्टिंक्शनचा विचार कशाला? एक तर सरसकट असे आक्षेपार्ह वाटणारे सगळेच प्रतिसाद उडवा, किंवा सगळेच ठेवा.

First of all, to be very frank with you, मी एकही प्रतिसाद उडवत नाही, किंवा संपादितही करत नाही.

पंचायत समितीच्या डोक्यावर सगळ्या जबाबदार्‍या मारून मोकळे झालो, म्हणजे मालक म्हणून तुमची येथील जबाबदारी संपली आणि वाटेल त्याला मनमुराद शिव्या घालायचे लायसन्स तुम्हाला मिळाले, असे निदान मला तरी वाटत नाही.

तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, परंतु पंचायत समितीने माझे शिव्यांचे प्रतिसाद अगदी बिनदिक्कत संपादित करावे किंवा काढूनही टाकावे, माझं काहीच म्हणणं नाही. कुणा एका माणसाच्या मर्जीवर एखादे संकेतस्थळावरील लेखन, प्रतिसाद, संपादन अवलंबून असावे याच्या मी पहिल्यापासूनच विरोधात होतो, लोकशाहीचा कट्टर समर्थक होतो/आहे. आणि म्हणूनच जी माणसं माझ्या ताटाखालचे मांजर होणार नाहीत, मालक म्हणून माझी जराही भीडभाड बाळगणार नाहीत, किंवा मी त्यांना पंचायत समितीचे सदस्य नेमले आहे म्हणून माझे मिंधेही होणार नाहीत, अशीच माणसं मी पंचायत समितीवर नेमली आहेत. आता ही मंडळी माझे शिव्यांचे प्रतिसाद काढून टाकत नाहीत किंवा संपादित करत नाहेत याला माझा काय इलाज सांग बरं!

पंचायत समितीपैकी तू कुणालाही विचार, मी अगदी सुरवातीपासूनच त्यांना माझ्या बरोबरीचे मानत आलो आहे, त्यांना त्यांच्या कार्यपद्धतीकरता संपूर्ण मुभा दिली आहे, तसेच मी मालक आहे तेव्हा मला काही विशेष सवलती हव्यात असा उच्चारही कधी केलेला नाही. आता यापेक्षा अधिक मी काय करायला हवं सांग बघू. लेखन-प्रतिसादाच्या बाबतीत पूर्ण अभिव्यक्ति स्वातंत्र्य असावं, आंतरजालावरील मराठी भाषेच्या प्रसाराकरता आणि प्रचाराकरता माझाही खारीचा हातभार लागावा, या हेतूने मी हे संकेतस्थळ काढलं, बोलल्याप्रमाणे इथे अभिव्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही रुजवायचा प्रयत्न केला, आणि माझे जराही मिंधे नसलेल्या व्यक्तिंना संपादनाचे सर्व अधिकार दिले, यात माझं काही चुकलं का ते सांग बरं!

१००% सोवळ्यातले तर आम्हीही नाही हो; पण शंभर लोकांमध्ये कोणत्याही प्रकारची शिवी देताना आपण कोठे आहोत, प्रसंग-परिस्थिती काय आहे, आजूबाजूला कोण आहे, याचे भान सुटून चालेल का? उद्या चार मित्रांच्या टोळक्यात मौजमस्ती करताना किंवा भांडणे करताना मी सुद्धा हजार शिव्या देईन, नव्हे दिल्याही आहेत. पण एखाद्या घरगुती समारंभात अशा मित्रांच्या जोडीलाच नातेवाईक असतानाही मी तशाच स्वरूपातील टिंगलटवाळीत किंवा खटके उडाल्यास होणार्‍या वादावादीत सामील होताना अशाच प्रकारच्या शिव्या देईन का, याचा विचार आपण करावा, असे मला वाटते.

The point is very well noted Sir! However, I do not promise anything, but will try my level best! )

अशाच प्रकारच्या (नॉट एग्जॅक्टली दिस) एका मुद्द्याबाबत मागे एकदा प्रियालीतईनेही तुम्हाला उपक्रमावर टोकल्याचे माझ्या चांगलेच लक्षात आहे. पण त्यानंतरही आज मला तुम्हाला (काही वेगळ्या बाबतींत तरी का होईना) टोकावे लागते आहे, याचे वाईट वाटते आहे.

वाईट वाटून घेण्याचं काहीच कारण नाही. उलटपक्षी माझ्याबद्दल किंवा मिसळपावबदल प्रामाणिक आत्मियता असल्याशिवाय एखादा माणूस वेळ काढून पानभर पत्र लिहीत नाही/लिहिणार नाही! In fact, I am obliged!

>>असे कटू प्रसंग वारंवार तुमच्याच बाबतीत अनुभवायला मिळत असतील, तर ते टाळण्यासाठी प्रयत्न कुणी करायला हवेत?

पंचायत समितीने! )

मिसळपाव हे मराठीतून लिहिण्यावाचण्यासाठी आणि विचार व्यक्त करण्यासाठी उपलब्ध करून दिलेले संकेतस्थळ असेल, तर कोणत्याही प्रकारच्या साहित्याला प्रतिसाद देताना मनोगत, तेथील प्रशासक आणि आधी तुमच्य मर्जीतली असणारी पण आता काही कारणांमुळे तुमच्या मर्जीतून उतरलेली मंडळी यांना मनसोक्त शिव्या घालण्याचे माध्यम म्हणून त्याचा उपयोग का होतो आहे / केला जात आहे?

चुकलं माझं! मी वेलणकरशेठची आणि सर्व संबंधितांची जाहीर क्षमा मागतो! आज मराठी संकेतस्थळांवर मी कोण आहे हे मला माहीत नाही, परंतु जो काही आहे तो वेलणकरशेठमुळेच आहे!

की मिसळपावच्या निर्मितीमागचे उद्दिष्टच अशा ओकार्या करण्यासाठीचे बेसिन उपलब्ध करून देण्याचे आहे? नक्कीच नसावे / नाही. पण मिसळपावावर येणार्‍या रँडम पाहुण्याचा मात्र नक्कीच तसा समज होणार, असे मला खात्रीपूर्वक वाटते.

खरं आहे तुझं! सालं सांभाळलं पाहिजे यापुढे!
Sorry Boss...!

त्यातून "हे असे होत आहे, होणार आहे; यायचे तर या नाहीतर गेलात बाझवत", अशी मग्रूरीची भाषा.

यापुढे काळजी घेईन...

तात्या.

2 comments:

Anonymous said...

सगळे रथी महारथी एक एक करुन निघुन गेल्यावर मिपाची जी भकास अवस्था झाली आहे ती पहावत नाही. काही गावाने ओवाळून टाकलेल्या पडीक लोकांनी मिपाच्या दर्जाची वाट लावली आहे.काडीचाही स्वाभीमान नसलेले थुंकी झेलू कणाहीन संपादक चमचेगीरी करताना पाहून माझ्यातला जुना मिपाकर तीळ तीळ तुटतो आहे. मी इथे कधीच लिहीत नाही पण आज राहवले नाही....

अवलिया said...

प्राजुला माकड म्हंटलं म्हणून मिपावरुन उडावलेले चतुरंगाचे विडंबन.
------------

डार्विन डार्विन काय म्हनतोस ?
अरे भलताच माकड येडा दिसतोस!

तोंड लाल अन झिपरं केस
हुप्प्यावानी सारा वेष
घर ना दार
कोलांट्या फार
झाडावर लटकुन काय बसतोस ?

माकड केव्हा माणसाळला
शोधायचं हे ठाव तुला
शेपटीचा गफला
तुला ना सुटला
शोधायची बात आता काय करतोस ?

मानुस झालो असलो रं
बापुस माझा वानर रं
साधुन मोका
देतोय धोका
मानसाचा इश्वास काय धरतोस ?

चतुरंग