प्राजुला माकड म्हंटलं म्हणून मिपावरुन उडावलेले चतुरंगाचे विडंबन.
------------
डार्विन डार्विन काय म्हनतोस ?
अरे भलताच माकड येडा दिसतोस!
तोंड लाल अन झिपरं केस
हुप्प्यावानी सारा वेष
घर ना दार
कोलांट्या फार
झाडावर लटकुन काय बसतोस ?
माकड केव्हा माणसाळला
शोधायचं हे ठाव तुला
शेपटीचा गफला
तुला ना सुटला
शोधायची बात आता काय करतोस ?
मानुस झालो असलो रं
बापुस माझा वानर रं
साधुन मोका
देतोय धोका
मानसाचा इश्वास काय धरतोस ?
चतुरंग
Saturday, March 28, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
रंग्या, खबरदार मिपावरील बयकांवर विडंबने केलीस तर! मला हे अजिबात आवडलेले नाही
प्राजुला तीचे बाबा लाडात डार्विन म्हणतात हे तीने सांगीतल्यावर आमच्य रंगाने बरोब्बर उचलले आणि विडंबन केले. तसा अगदी गुणी हा आमचा रंगा!
उगीचच उडालं विडंबन...!
सदर विडंबन पुन:प्रकाशित करण्याचे अधिकार आम्ही राखतो परंतु आम्ही तसे करणार नाही! आम्ही संपादकांच्या मर्जीबाहेर नाही..
मा. मिसळप्रेमी...
हे निवेदन आम्ही आमच्या ब्लॉगावर प्रकाशित केले होते. मात्र स्वस्तखाद्यपदार्थनामधारी संस्थळाचा उल्लेखही आमच्या ब्लॉगावर नको म्हणून तुमच्याकडे देत आहे.
आपला,
(विचक्षण) धोंडोपंत
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
लोकहो,
आज आमच्या काही स्नेह्यांनी आणि वाचकांनी फोन आणि निरोपकाच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क साधून एका संकेतस्थळावर आमच्या संदर्भात असलेले लेखन, ज्यात आमचाबद्दल काही चांगले लिहिले गेले होते, असे लेखन, त्या संकेतस्थळाच्या मालकांनी आकसापोटी उडविले असल्याचे सांगितले आणि जेव्हा त्या संकेतस्थळावरील काही सदस्यांनी मालकांना आमच्याबद्दलचे लेखन उडविण्याच्या भूमिकेबद्दल काही प्रश्न विचारले तेव्हा मालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली असे आम्हाला सांगण्यात आले.
लोकहो, त्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर कोणते लेखन ठेवायचे आणि कोणते उडवायचे हा त्या माननीय मालकांचा आणि आदरणीय प्रशासकांचा प्रश्न आहे. त्याबद्दल आम्ही काय बोलणार? आमचा तो विषय नाही.
त्यामुळे तेथे आमच्या संदर्भातील लेखन उडविले गेले किंवा आमच्याबद्दल काही गरळ ओकली गेली तर तुम्ही अस्वस्थ होऊ नका आणि त्याला विरोध करू नका आणि आमच्यामुळे तुमचा अपमान करून घेऊ नका हेच सांगण्यासाठी हे निवेदन.
खरेतर, आम्ही जेव्हा त्या संस्थळावरून बाहेर पडलो त्यावेळेस मालकांना स्वत:हून अनेकदा विनंती केली होती की आम्ही जे लेखन तुमच्या संस्थळावर केले आहे ते सर्व उडवून टाकावे. ही विनंती गुगल निरोपकावर तसेच फोनवरही केली होती. त्यात आमचा उद्देश हा होता की आमच्यामागे आमचे लेखन रहायला नको. आम्ही एखादे ठिकाण सोडल्यावर आमच्या पाऊलखुणा मागे राहू नयेत असे आमचे मत आहे. पण मालकांचा आमच्यावर नसला तरी आमच्या लेखनावर फार जीव. त्यामुळे ते आम्ही केलेल लेखन उडवत नाहीत आणि आमच्याबद्दल कुणी काही चांगले बोललेलेही त्यांना खपत नाही.
(किमान या लेखामुळे तरी मालकांचा पारा चढून मालक आमचे सर्व लेख आणि सदरे त्या संस्थळावरून उडवतील अशी आशा करूया. कारण मालक आमचा ब्लॉग वाचतात आणि काहीवेळा त्यांच्या खास शैलीतले अभिप्रायही इथे ठोकतात. अर्थात ते आम्ही इथे प्रकाशित करत नाही. तर या लेखामुळे मालकांचा पारा चढून आमचे सर्व लेख तेथून उडविले जातील अशी आशा करायला काहीच हरकत नाही. तसे झाले तर फारच उत्तम होईल. असो.)
तर सांगायची गोष्ट अशी की, आम्ही सध्या फक्त आमच्या ब्लॉगावर आणि आमच्या एका स्नेह्यांच्या गझलेच्या संकेतस्थळावर व काही ऑर्कूटसमूहावर लेखन करतो. रसिकजनांच्या आग्रहाखातर "सांजवेळ" हा मराठी ललितलेखनाला वाहिलेला ब्लॉगही सुरू केला आहे.
छंदशास्त्रावरील आमचे आगामी लेखन तिथे होणार आहे. त्यामुळे काव्यप्रेमींच्या "छंदशास्त्राचे काय?" या प्रश्नाची सोडवणूक झालेली आहे.
लोकहो, एखाद्याने डोक्यावर पांघरूण घेतले म्हणजे सूर्योदय टाळता येत नाही. नदीचा ओघ कुणीही थोपवू शकत नाही. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत आहे त्याला रसिकमान्यता प्राप्त होणारचं आणि लोकाश्रय मिळणारच. त्यामुळे कुठेही आमचे लेखन उडवले तरी काळजीचे कारण नाही. कारण
गटारात खुपसुनी माना सूर्य शोधती जे
गगन का तयांचे मिंधे राहणार आहे?
नुसता स्वतःच्या नावाचा गवगवा करून, ठराविक लोकांना आपल्यामागे लेझिम खेळायला लावून आणि आपले कंपू उभारून कुणीही खर्या अर्थाने मोठा होत नसतो. बोभाटा म्हणजे कीर्ति नव्हे.
आमच्या कुंडलीत तृतीयस्थानाची आणि दशमाची दशा सुरू आहे. हा कालावधी लेखनाच्या माध्यमातून अफाट प्रसिद्धी, समाजमान्यता, कीर्ति आणि लोकाश्रय दाखवतो. त्याची अनुभूती आम्ही घेत आहोतच. त्यामुळे कोणी कितीही काहीही हलकटपणा केला, तरी त्यातून आम्हाला काहीही फरक पडत नाही.
आमचे सुजनत्व आणि स्वायत्तता यांच्याशी तडजोड आम्ही कधीही करणार नाही.
आमच्या लेखनाचा फैसला आम्ही तमाम मराठी जनतेवर सोडला आहे आणि त्या मराठी माणसांच्या निर्णयक्षमतेवर आणि सृजनशीलतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. दादांनी म्हटले आहे की,
अरे या जिंदगानीची कधी मी काळजी केली?
मला सांभाळण्यासाठी मराठी वैखरी होती
या माय मराठीची सेवा करत आम्ही जगू. महाराष्ट्र, मराठी भाषा आणि संस्कृती यासाठी सर्वस्व देऊ.
हे विश्वाचे आंगण आम्हां दिले आहे आंदण!
तेथे आम्ही शुद्ध रसपान करू आणि आमच्या लेखणीतून जास्तीत जास्त चांगले आणि सकस लेखन मराठीला देण्याचा प्रयत्न करू.
आणि सर्व मराठी बांधवानांही आमच्या सोबत घेऊन त्यांच्याही जीवनात आनंद निर्माण करू.
चल ये रे, ये रे गड्या
नाचू दो घालू फुगड्या
खेळू झिम्मा, झिम पोरी, झिम पोरी,
झिम पोरी झिम पोरी झिम
आपला,
(आनंदयात्री) धोंडोपंत
Post a Comment