मिसळभोक्ता लिहितात..

हे ज्ञानबा तुकाराम डावीकडे दिसत असताना "भां*त", आणि "बा*वला तिच्यायला" असे उजवीकडे लिहिणे म्हणजे खरेच वारीचे पुण्य मिळवणे!

धन्य तात्या ! आणि धन्य तो अनाम म्हातारा !


Saturday, December 13, 2008

एका ज्योतिश्याची कैफियत

एका ज्योतिश्याची कैफियत

अरे बेशरम्यांनो, मला का विचारता मुंबईवर हल्ला होणार हे भाकित माझ्या ब्लागावर पूर्वीच का नाही टाकले? अरे मी दोन दिवस आधीच मिपावर हा 'हल्ला होणार आणि सर्व दहशतवाद्यांची नावे' असा लेख मिपावर टाकला होता। रात्री टाकला न् सकाळी उठून पाहतो तर गायब।

तात्याला विचारले, हे काय डायरु, अरे अघोषित आणिबाणी होती तर आधी तरी बोलायचस।

तर चावट मेला म्हणतो कसा - "अरे तुला रात्री जास्त झाली. उगाचच भास झाला की आपण हे भाकित आधीच जनतेला सांगतोय. तसे नसते तर तू सात दिवसाचा 'लेखन उपास' केला असतास काय. उद्विग्न, खिन्न, विषण्ण असे डोळ्यात पाणी आणणारे शब्द वापरले असतेस काय? अरे मी तुझा लंगोटी यार, हे ज्योतिष वैगरे इतरांना सांग. मला काय तुझे अगाध ज्ञान ठाऊक नाही ह्या विषयातले? अरे ते दुष्ट मनोगती मिपा बंद पाडणार हे तरी तुला ४ दिवस आधी सांगता आले का? उगाच का फोका मारतोस?"

5 comments:

Anonymous said...

चला, मिपाच्या मोरीला लागलेला धोंड्याचा बोळा निघाला. मिपातील घाण पाणी वाहते झाले.

सौरव गेला, आता द्रविड कधी जाणार ह्याची वाट पाहायची. त्याशिवाय का आमच्या सारख्या तरुण रक्ताला वाव मिळणार? इतके वर्ष कसेही करून वारंवार निष्ठादर्शन करायचे हेच जीवनाचे इतिकर्तव्य मानले होते त्याला उशीरा का होईना फळ मिळणार बहुदा.

काय करणार... सुप्रियाताईसारखे माझ्या 'अंगी' खास गुण नाहीत आणि तात्यांनी अजून 'दोस्ताना'
पाहिलेलाच नाही. परत खरी गोष्ट अशी की आम्ही काही अमेरिकावासी नाही व ब्राह्मण व त्यातून कोकणस्थ तर अजिबात नाही. आम्ही पडलो, मराठा आणि ते पण कर्‍हाडातले. मिपा संपादकपदावर कशी दर्णी लागायची?

Anonymous said...

सध्या बराच मोठा स्रीवर्ग मिपावर चाललेल्या अश्लिलतेला कंटाळून मिपा सोडून जात आहे. एकुणच हल्ली फारतर फार यशोधरा, प्राजु, शरयु, अदिती आणि अज्जुका कधी मधी लिहितात. वाहिदा तर फार टिकेल असे वाटत नाही.

अर्थात ह्या उल्लेखित नावात तात्यांचे खोटे आयडी किती ते सांगणे अंमळ कठिणच.

Anonymous said...

खरंय तुमचं म्हणणं! प्राजुताई पण आजकाल एकदम लिहायच्या बंद झाल्या आहेत हे बर्‍याच जणांच्या लक्षात आलेले आहे. तात्याची शीव्या द्यायची सवय जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत स्त्रि वर्गाचा वावर मोकळेपणे मिपावर होणे अवघड आहे.

Anonymous said...

सध्या बराच मोठा स्रीवर्ग मिपावर चाललेल्या अश्लिलतेला कंटाळून मिपा सोडून जात आहे.

साफ खोटे आहे हे. मी पहा आजच नवीन रुप घेऊन "थालिपीठाची" पाकृ मिपावर लिहिली.

कोणाला कळू नये म्हणून अशुद्धलेखनाचा बुरखा पण घेतला आहे. अजून ७-८ बायकी आयडी घेऊन लिहिन तिथे. मग पाहतो कोणाची हिम्मत होते मिपावर स्रिया नाहीत म्हणून म्हणायची.

मिसळप्रेमी,

(जुना माधवी)तात्या

Anonymous said...

अहो पण तो बुरखा दुसर्‍या लेखातच फाटला की हो.

मी तोच विचार करत होतो, ही बाई पहिल्या थालिपीठाची पाकृ इतकी अशुद्ध लिहिते मात्र लगेच पुढचा लेख मात्र व्याकरणशुद्ध. ही काय भानगड आहे बुवा...